IPL सट्टेबाजीचा पर्दाफाश! यवतमाळच्या क्रिकेट बुकींचा अमरावतीतील अड्डा उद्ध्वस्त 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2020 07:58 PM2020-10-08T19:58:48+5:302020-10-08T20:00:10+5:30

IPL Betting : अमरावती शहर पोलिसांची धाड : आयपीएल सट्टयाचे यवतमाळ कनेक्शन पुन्हा उघड

IPL betting exposed! Yavatmal cricket bookie's base in Amravati demolished | IPL सट्टेबाजीचा पर्दाफाश! यवतमाळच्या क्रिकेट बुकींचा अमरावतीतील अड्डा उद्ध्वस्त 

IPL सट्टेबाजीचा पर्दाफाश! यवतमाळच्या क्रिकेट बुकींचा अमरावतीतील अड्डा उद्ध्वस्त 

googlenewsNext
ठळक मुद्देलॅपटॉपवर व विविध मोबाईलवरून लोक सट्टा खेळून त्याचे लिखाण आरोपी एका कागदावर करीत असताना दिसले. 

अमरावती : यवतमाळच्या क्रि केट बुकींचा अमरावतीतील अड्डा गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी उद्ध्वस्त केला. त्यामुळे अमरावतीतील आयपीएल सट्टयाचे यवतमाळ व अकोला कनेक्शन असल्याचे पुन्हा उघड झाले. गुन्हे शाखेच्या पथकाने खोलापुरीगेट ठाण्यांतर्गत साईनगरनजीकच्या विश्रामनगर येथील रागेश्री अपार्टमेंटमधील अवघड यांच्या फ्लॅटमध्ये धाड टाकून चौघांना अटक करून त्यांच्याजवळील ६ लाख ६५ हजार २९० रुपयांचे जुगार साहित्य जप्त केला. काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेच्या पथकाने वलगाव ठाणे हद्दीतील शिराळा येथे धाड टाकून आयपीएल क्रिकेटचा सट्टा पकडला होता. त्या कारवाईतसुद्धा मुख्य मास्टर मार्इंड आरोपी हा यवतमाळ जिल्ह्यातील नेर परसोपंत येथील असल्याचे उघड झाले होते. बुधवारी पार पडलेल्या चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध  कोलकत्ता नाईड रायर्डस यांच्यात रंगलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यावर मोबाईल फोनच्या  साह्याने बेटींग घेऊन सट्टा खेळला जात असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यांनी धाड टाकली तेव्हा घटनास्थळावर एलईडीवर मॅच सुरू होती. लॅपटॉपवर व विविध मोबाईलवरून लोक सट्टा खेळून त्याचे लिखाण आरोपी एका कागदावर करीत असताना दिसले. 


यावेळी आरोपी रमेश सुगनचंद कटारीया (४१), अविनाश विजयकुमार प्रेमचंदाणी (४६ दोन्ही रा. वैद्यनगर, सिंधी कॅम्प आर्णी रोड यवतमाळ), आकाश राजू विरखेडे(२४ रा. एकता नगर वाघापूर यवतमाळ), राजकुमार ईश्वरलाल गेही (४० सिंधी कॅम्प पक्की खोली अकोला या आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून नगदी ५९,४६० रुपये, विविध कंपनीचे ४३ हजाराचे १२ नगर मोबाईल, तसेच जुगार खेळाचे साहित्य तसेच एमएच २९ बीपी ००९० क्रमांकाची कार, एमएच २९एई २२२९ क्रमाकाची दुचाकी, लॅपटॉप असा  एकूण ६ लाख ६५ हजार २९० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. फ्लॅट मालक सुरेश महादेवराव अवघड याने आयपीएल जुगार सट्टा खेळण्याकरिता फ्लॅट उपलब्ध करून दिल्याने मुख्य आरोपी व फ्लॅट मालकावर भादंविचे कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४  सहकलम महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम ४,५ सहकलम भारतीय टेलीग्राम कायदा कलम २५(सी) प्रमाणे गुन्हा नोंदविला. आरोपीला न्यायालयाने ११ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.  ही कारवाई पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या आदेशाने गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

Web Title: IPL betting exposed! Yavatmal cricket bookie's base in Amravati demolished

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.