माझ्या नवऱ्याची सतराशे साठ लफडी; आयपीएस अधिकाऱ्याच्या पत्नीचं थेट केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 10:18 AM2020-09-02T10:18:46+5:302020-09-02T10:21:28+5:30
या महिलेचा नवरा लखनऊचा रहिवासी असून ती २००९ बॅचचा आयपीएस अधिकारी असल्याचे सांगण्यात येत आहे.
लखनऊ - यूपी केडरच्या आयपीएस अधिकाऱ्यावर त्याच्या पत्नीने गंभीर आरोप केले आहेत. आयपीएस अधिकाऱ्याची पत्नी स्वत: महिला अधिकारी असून सध्या ती दिल्लीत तैनात आहे. या महिला अधिकाऱ्याने आपल्या नवऱ्यावर आरोप करत त्याचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध आहेत, याशिवाय ते फोनवर महिलांशी अश्लिल बोलतात, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
यासंदर्भात आयपीएस अधिकाऱ्याच्या पत्नीने थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना ४ पानी पत्र लिहिले आहे. या पत्रासोबतच तिने पतीच्या महिलांसोबत अश्लील संभाषणाचे ५० पेक्षा जास्त चर्चेचे स्क्रिनशॉट्स पाठवले आहेत. याशिवाय महिलेने पेन ड्राईव्हमध्ये आयपीएस संभाषणाचा व्हिडिओही अमित शहा यांना पाठविला आहे. या पत्राची एक प्रत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि डीजीपी यांनाही पाठविली आहे.
या महिलेचा नवरा लखनऊचा रहिवासी असून ती २००९ बॅचचा आयपीएस अधिकारी असल्याचे सांगण्यात येत आहे. या अधिकाऱ्याच्या पत्नीचे म्हणणे आहे की, त्यांचे लग्न २०१४ मध्ये झालं होतं. लग्नानंतर तिचा नवरा झांसी, एटा, अयोध्या आणि मेरठ अशा अनेक शहरांमध्ये कार्यरत होता आणि येथेच त्याने वेगवेगळ्या महिलांशी संबंध निर्माण केले असा पत्नीचा आरोप आहे. मध्य प्रदेशच्या सीमेवरील एका जिल्ह्यातील १८ वर्षीय तरुणीचे आपल्या पतीसोबत संबंध असल्याचे उघड झाले आहे. ज्यावेळी हे आय.पी.एस. अधिकारी त्याच जिल्ह्यात तैनात होता. त्यावेळी मुलगी आपल्या आईवडिलांसोबत एका केसच्या निमित्ताने एस.पी.( पौलीस अधिक्षक कार्यालय ) ऑफिसमध्ये आली होती. त्या दरम्यान, या दोघांची ओळख झाली. हळूहळू त्यांचे संबंध वाढत गेले. महिलेने आयपीएस पतीची ही चूक अनेक वेळा पकडली गेली परंतु कुटुंबासमोर त्याने आपली चूक मान्य करून लेखी माफी मागितली. तिचा नवरा सध्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर आहे आणि तपास एजन्सीच्या मुख्यालयात पोस्टवर कार्यरत आहे.
याठिकाणी एका घटस्फोटीत महिलेशी आयपीएस पतीने अनैतिक संबंध ठेवले आहेत. लग्नाच्या बहाण्याने त्या महिलेला आपल्यासोबत ठेवलं आहे. त्यामुळे पतीच्या वागणुकीला कंटाळून पत्नीने थेट केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहून स्वत:च्या पतीवर गंभीर आरोप करत त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.