IPS अधिकाऱ्याच्या पत्नीची पर्स गेली चोरीला; अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 09:10 PM2021-12-24T21:10:58+5:302021-12-24T21:11:33+5:30

Robbery Case : एका ५६ वर्षीय महिलेने अंधेरी पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

IPS officer's wife's purse stolen; Report to Andheri Police Station | IPS अधिकाऱ्याच्या पत्नीची पर्स गेली चोरीला; अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार

IPS अधिकाऱ्याच्या पत्नीची पर्स गेली चोरीला; अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार

Next

मुंबई -  बुधवारी अंधेरी (पूर्व) येथे बेस्ट बसमधून प्रवास करत असताना आयपीएस अधिकाऱ्याच्या पत्नीची पर्स चोरीला गेली. याबाबत एका ५६ वर्षीय महिलेने अंधेरी पोलिसातचोरीचा गुन्हा दाखल केला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

तक्रारदार महिला, मलबार हिल येथील रहिवासी असून, ती सध्या महाराष्ट्र पोलिसात उपमहानिरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या IPS अधिकाऱ्याची पत्नी आहे. बुधवारी सकाळी 11.50 ते 12.15 च्या दरम्यान ती चकाला येथून बेस्टच्या बसने घरी परतत असताना ही घटना घडली. तक्रारदार महिलेने तिची बॅग उघडून रेल्वे स्थानकावर तिकीट घेण्यासाठी एक छोटी पर्स काढली होती. बसमधून उतरल्यानंतर तिची पर्स हरवल्याचे तिच्या लक्षात आले.

महिलेने बस डेपोत धाव घेतली आणि एका अधिकाऱ्याशी बोलल्या. त्या अधिकाऱ्याने बस कंडक्टरला फोन केला आणि त्यांची पर्स बसमध्ये आहे की नाही याबाबत विचारणा केली. परंतु बस कंडक्टरने सांगितले की, पर्स सापडली नाही, त्यानंतर त्यांनी अंधेरी पोलिस स्टेशन गाठले आणि आयपीसीच्या कलम 379 नुसार चोरीचा गुन्हा दाखल केला.

Web Title: IPS officer's wife's purse stolen; Report to Andheri Police Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.