IPS Vikas Vaibhav: डीजी मॅडमच्या तोंडून शिव्या ऐकून व्यथित, बंधनातून मुक्त व्हायचेय; आयपीएस विकास वैभव य़ांच्या ट्विटने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 06:53 PM2023-02-09T18:53:15+5:302023-02-09T18:53:52+5:30

ट्विटने केवळ बिहारमध्येच नाही तर देशभरातील आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. बिहारचे प्रसिद्ध आयपीएस अधिकारी विकास वैभव यांचे हे ट्विट आहे. यामुळे पोलीस विभागातही हादरे बसले आहेत. 

IPS Vikas Vaibhav: Distressed by insults from DG Madam, wants to be freed from bondage; IPS Vikas Vaibhav's tweet caused stir in Bihar | IPS Vikas Vaibhav: डीजी मॅडमच्या तोंडून शिव्या ऐकून व्यथित, बंधनातून मुक्त व्हायचेय; आयपीएस विकास वैभव य़ांच्या ट्विटने खळबळ

IPS Vikas Vaibhav: डीजी मॅडमच्या तोंडून शिव्या ऐकून व्यथित, बंधनातून मुक्त व्हायचेय; आयपीएस विकास वैभव य़ांच्या ट्विटने खळबळ

googlenewsNext

डीजी मॅडमच्या तोंडून मी तेव्हापासून रोज विनाकारण शिव्या ऐकत आहे. बंधनातून मुक्त व्हायचे आहे, अशा ट्विटने केवळ बिहारमध्येच नाही तर देशभरातील आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. बिहारचे प्रसिद्ध आयपीएस अधिकारी विकास वैभव यांचे हे ट्विट आहे. यामुळे पोलीस विभागातही हादरे बसले आहेत. 

विकास वैभव यांनी ट्विटर आणि फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. 'मला 18.10.2022 रोजी आयजी, होमगार्ड आणि अग्निशमन सेवेची जबाबदारी देण्यात आली होती आणि तेव्हापासून मी सर्व नवीन जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तेव्हापासूनच मला दररोज डीजी मॅडमच्या तोंडून विनाकारण शिवीगाळ होत आहे. मी ऐकत आहे (रेकॉर्ड केलेले देखील)! पण आज प्रवाशाचे मन खऱ्या अर्थाने व्यथित झाले आहे. बंधनातून मुक्त व्हायचेय', असे विकास वैभव यांनी म्हटले आहे. 

विकास वैभवच्या ट्विटचा स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी होमगार्ड आणि अग्निशमन दलाच्या डीजी शोभा अहोटकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. काहीही कारण नसताना त्या माझ्यासोबत गैरवर्तन करत आहेत, असे त्यात म्हटले होते. हे ट्विट व्हायरल झाल्यावर विकास यांनी ते तातडीने डिलीट केले आहे. परंतू, त्यांच्या हँडलवर आणखी काही ट्विट आहेत, ज्यावरून त्याचा अंदाज बांधता येत आहे. 

बिहारमधील प्रशासकीय अधिकारी आजकाल त्यांच्या असभ्य वर्तनामुळे खूप चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी कनिष्ठ अधिकाऱ्याला शिवीगाळ करताना वरिष्ठ IAS केके पाठक यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. 

'प्रवाशाचे मन व्यथित आहे! बंधनातून मुक्त व्हायचे आहे! परिस्थितीमुळे अडथळे निर्माण होतात असे वाटले तरी #प्रवाशाच्या मनाला हेही माहीत असते की #प्रवाशाच्या मनाला कोणीही बांधू शकत नाही! जे ठरवले आहे ते स्वतःचा मार्ग मोकळा करेल! बाकी सगळा भ्रम आहे पण कृती महत्वाची आहे!' असे आणखी एक ट्विट आहे. 

Web Title: IPS Vikas Vaibhav: Distressed by insults from DG Madam, wants to be freed from bondage; IPS Vikas Vaibhav's tweet caused stir in Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Biharबिहार