इक्बाल कासकरची पुन्हा ठाणे जेलमध्ये रवानगी, कोर्टाने सुनावली न्यायालयीन कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 03:36 PM2022-02-24T15:36:56+5:302022-02-24T15:38:18+5:30
Iqbal kaskar Remanded : कासकर याला डायबिटीस असल्याने ठाणे जेलमध्ये नेण्याआधी त्याला जेवण देण्याची कासकरच्या वकिलांनी मागणी केली आहे.
मुंबई सत्र न्यायालय विशेष पीएमएलए कोर्टाने इक्बाल कासकरला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ईडीकडून कस्टडीसाठी मागणी केली गेली नाही. इक्बाल कासकरची पुन्हा ठाणे जेलमध्ये रवानगी होणार आहे. इक्बाल कासकरला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
इक्बाल कासकरच्यावकिलांनी कोर्टात एक अर्ज केला आहे. ज्यात इकबाल कासकर ईडी कोठडी असताना काही इंग्रजी भाषेतील काही कागदपत्रांवर त्याची स्वाक्षरी घेतली गेली. इक्बाल कासकर यांना इंग्रजी भाषा कळत नसल्याची कासकर यांच्या वकिलांनी माहिती दिली. कासकर याला डायबिटीस असल्याने ठाणे जेलमध्ये नेण्याआधी त्याला जेवण देण्याची कासकरच्या वकिलांनी मागणी केली आहे.
कोर्टाने परवानगी देत ईडी कार्यालयात कासकरला जेवण देऊन मग ठाणे जेलमध्ये नेण्याचे आदेश दिले आहेत. ठाण्याच्या जेलमध्ये दुपारी 3.30 पर्यंत गुंड इक्बाल कासकर याला घेऊन येत आहेत. वकिलांचे असे म्हणणे आहे की, इक्बाल कासकर याची ज्या पेपरवर सही घेण्यात आली, त्यावर इंग्रजीमध्ये सगळे लिहिले होते आणि त्यामुळे इक्बालला काही समजले नाही.