इक्बाल कासकर ‘ईडी’च्या ताब्यात, ठाण्याच्या तुरूंगातून घेतला ताबा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 05:26 PM2022-02-18T17:26:27+5:302022-02-18T17:27:48+5:30

Iqbal kaskar : तो बनावट कागदपत्रांवर अनेकदा पाकिस्तानला गेल्याची माहिती असून, ईडीने त्याच्यासह इक्बाल कासकर याचे बॅंक खाते आणि संपत्तीचा तपशीलही मिळवला आहे.

Iqbal Kaskar took possession of 'ED' from Thane Jail | इक्बाल कासकर ‘ईडी’च्या ताब्यात, ठाण्याच्या तुरूंगातून घेतला ताबा

इक्बाल कासकर ‘ईडी’च्या ताब्यात, ठाण्याच्या तुरूंगातून घेतला ताबा

Next

ठाणे : अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याचा ताबा शुक्रवारी ‘ईडी’ने (सक्तवसुली संचालनालय) ठाण्याच्या कारागृहातून घेतला. खंडणी, अमली पदार्थांची तस्करी आणि तत्सम काळ्या धंद्यांतून कमावलेला पैसा हवालाद्वारे फिरवून तो देशविरोधी कारवायांसाठी वापरला जात असल्याचा संशय  ‘ईडी’ला आहे.
‘एनआयए’ला (राष्ट्रीय तपास संस्था) दाऊदशी संबंधित एका प्रकरणाच्या तपासादरम्यान काही आर्थिक गैरव्यवहारांची माहिती मिळाली होती. त्यानुसार ईडीने मनी लाॅंड्रिंगचा गुन्हा दाखल करुन १५ फेब्रुवारी रोजी मुंबई, तसेच ठाण्यात छापेमारी केली. यावेळी मिळालेली कागदपत्रे आणि माहितीच्या आधारे ईडीने छोटा शकीलचा हस्तक सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रुट याला मुंबईच्या डोंगरी भागातून अटक केली. तो बनावट कागदपत्रांवर अनेकदा पाकिस्तानला गेल्याची माहिती असून, ईडीने त्याच्यासह इक्बाल कासकर याचे बॅंक खाते आणि संपत्तीचा तपशीलही मिळवला आहे.

ठाणे पोलिसांनी इक्बाल कासकरला २०१७ साली खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली होती. तेव्हापासून तो ठाण्याच्या तुरूंगातच आहे. इक्बालविरुद्ध जे गुन्हे दाखल केले होते, त्यामध्ये अनिस इब्राहिम आणि आणखी काही कुख्यात गुंडांचाही समावेश होता. या गुन्ह्यांच्या तपासादरम्यान ठाणे पोलिसांनी मिळवलेले पुरावे ईडीने स्वत:च्या ताब्यात घेतले होते. आता मनी लाॅंड्रिंगच्या प्रकरणातही इक्बालचा सहभाग तपासण्यासाठी ईडीने त्याचा ताबा मुंबईच्या विशेष पीएमएलए कोर्टाला मागितला होता. त्यानुसार शुक्रवारी इक्बालचा ताबा घेण्यासाठी दोन गाड्यांमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांचा ताफा ठाण्याच्या कारागृहात दाखल झाला. न्यायालयाच्या आदेशानुसार इक्बालला त्यांच्या ताब्यात दिल्याची माहिती तुरुंग अधीक्षक हर्षद अहिरराव यांनी दिली.

Web Title: Iqbal Kaskar took possession of 'ED' from Thane Jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.