लोखंडी रॉड, हॉकी स्टिकने एकमेकांची डोकी फोडली; नमाज पठाणावरून २ गटात पेटला वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 07:30 PM2021-05-10T19:30:38+5:302021-05-10T19:43:42+5:30

Dispute in 2 groups over Namaz Pathan : या हाणामारीत दोन्ही गटातील ६ जण जखमी झाले आहेत. हा प्रकार नंदुरबार शहरातील चिराग अली मशिदीसमोर घडला. 

Iron rods, hockey sticks smashed each other's heads; Dispute in 2 groups over Namaz Pathan | लोखंडी रॉड, हॉकी स्टिकने एकमेकांची डोकी फोडली; नमाज पठाणावरून २ गटात पेटला वाद

लोखंडी रॉड, हॉकी स्टिकने एकमेकांची डोकी फोडली; नमाज पठाणावरून २ गटात पेटला वाद

Next
ठळक मुद्दे पोलिसांनी आतापर्यंत १२ जणांना अटक केली असून अन्य ९ जणांचा शोध घेतला जात आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात ठिकठिकाणी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणी कडक निर्बंध लादले आहे. कोरोना प्रसाराचा धोका लक्षात घेऊन मशिदीत गर्दी करू नका, असं सांगत नमाज पठण करण्यापासून रोखल्यानं दोन मुस्लीम गटात वाद विकोपाला गेला. लोखंडी रॉड, लाकडी काठ्या आणि हॉकी स्टिकने दोन्ही गटांनी एकमेकांची डोकी फोडली आहेत. या हाणामारीत दोन्ही गटातील ६ जण जखमी झाले आहेत. हा प्रकार नंदुरबार शहरातील चिराग अली मशिदीसमोर घडला. 

सध्या घटनास्थळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून वातावरण शांत करण्यात आले आहे. याप्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तसेच पोलिसांनी आतापर्यंत १२ जणांना अटक केली असून अन्य ९ जणांचा शोध घेतला जात आहे.

८ मे रोजी रात्री शहरातील मुस्लीम बांधव चिराग अली मशिदीसमोर नमाज पठणासाठी जमले होते. यावेळी मशिदीसमोर गर्दी करू नका,  आले. आतमध्ये एकावेळी फक्त पाच जणांनाच प्रवेश आहे. नमाज पठण करण्यापासून रोखल्यामुळे एक जमाव दुसऱ्या जमावावर धावून गेला. त्यानंतर दोन्ही गटात बाचाबाची सुरू झाली आणि याचं रुपांतर हाणामारीत झालं, अशी माहिती दैनिक पुढारीने दिली आहे. 

आम्हाला नमाजासाठी मशिदीत जाण्यापासून कसं काय रोखलं ? असा जाब विचारत एका गटाने लोखंडी रॉड, लाकडी काठ्या आणि हॉकी स्टिकने दुसऱ्या गटावर हल्ला केला. त्यावेळी समोरच्या गटानेही प्रतिहल्ला केला. नमाज पठणावरून झालेल्या या हाणामारीत एकूण ६ जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Iron rods, hockey sticks smashed each other's heads; Dispute in 2 groups over Namaz Pathan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.