लोखंडी सळी कोसळून एक जखमी, तर गोवंडीत झाडाची फांदी अंगावर पडून एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 06:52 PM2019-06-15T18:52:33+5:302019-06-15T18:54:30+5:30
सुसाट वाऱ्यामुळे झाडे पडण्याच्या घटना वाढत आहेत.
मुंबई - परळ येथे जीएसटी कार्यालयावर गुरुवारी लोखंडी सळी अंगावर कोसळल्याने एक जण जखमी झाला. दुर्घटनेत जखमी झालेल्याचो नाव राहुल सराफ असे आहे. गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. राहुल यांना परळ येथील ग्लोबल हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती ग्लोबल हॉस्पिटलचे डॉ. अमेय यांनी मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला दिली.
तर गोवंडी येथे अणुशक्ती नगर परिसरात झाडाची फांदी कोसळून अंगावर पडल्याने एकजण जखमी झाल्याची घटना घडली. काल दुपारी ४. १५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून सुसाट वाऱ्यामुळे झाडे पडण्याच्या घटना वाढत आहेत. जखमी इसमास बीएआरसी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. परंतु दाखल करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आलं. मृत व्यक्तीचे नाव नितीन विष्णू शिरवळकर असं असून बीएआरसीमध्ये सायंटिफिक असिस्टंट म्हणून इलेक्ट्रिक विभागात काम करत होते. मात्र, झाडाची फांदी कोसळल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना बीएआरसीमधील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात येत होतं, मात्र दाखलपूर्व त्यांचा मृत्यू झाला.