इशरत जहाँ प्रकरण : डीजी वंजारा आणि एनके अमीन यांना मोठा दिलासा; न्यायालायने केले दोषमुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 06:16 PM2019-05-02T18:16:24+5:302019-05-02T18:18:36+5:30
याप्रकऱणी न्यायालयाने ३० एप्रिल रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता.
अहमदाबाद - इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरणी सीबीआय विशेष कोर्टाने निवृत्त पोलीस महासंचालक डी. जी. वंजारा, आणि एन के अमीन यांना दिलासा दिला आहे. दोघांनाही न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. याप्रकऱणी न्यायालयाने ३० एप्रिल रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता.
इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरणात माजी पोलीस महासंचालक वंजारा आणि एन के अमीन यांनी २६ मार्च आपली आरोपमुक्त करण्यासाठी अर्ज सीबीआय कोर्टात केला होता. त्यानतंर सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जे. के. पांडे यांनी तो अर्ज मंजूर केला. या प्रकरणी सीबीआयने माजी पोलीस महासंचालक पी. पी. पांडे, माजी महासंचालक डी. जी. वंजारा, जी. एल. सिंघल, एन. के. अमीन, तरुण बरोट यांच्यासह अन्य २ पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपी करण्यात आले होते.
Ahmedabad: Special CBI Court of Justice JK Pandya accepts the applications of retired police officers DG Vanzara and NK Amin seeking dropping of proceedings against them in Ishrat Jahan fake encounter. The court had concluded hearing in the case on April 16.
— ANI (@ANI) May 2, 2019
अहमदाबाद - इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरण : डीजी वंजारा आणि एनके अमीन यांना मोठा दिलासा https://t.co/fUWIufFuiq
— Lokmat (@MiLOKMAT) May 2, 2019