मोठी बातमी! ISI च्या एजंटला कच्छमधून अटक, भारतातील पाक एजंट यांना करत होता पेमेंट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 03:48 PM2020-08-31T15:48:47+5:302020-08-31T15:55:10+5:30
हे प्रकरण १९ जानेवारी रोजी लखनौच्या गोमती नगर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या एफआयआरशी संबंधित आहे.
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) गुजरातच्या कच्छ येथून पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आयएसआयसाठी कार्यरत असलेल्या रजकभाई कुम्हारला अटक केली आहे. रजकभाई कुम्हार मुंद्रा डॉकयार्ड येथे पर्यवेक्षक म्हणून काम करत होता.
हे प्रकरण १९ जानेवारी रोजी लखनौच्या गोमती नगर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या एफआयआरशी संबंधित आहे. या प्रकरणात, राशिद नावाच्या व्यक्तीस उत्तर प्रदेशातील चांदौली येथून अटक केली गेली. राशिदच्या अटकेनंतर केलेल्या तपासणीदरम्यान हा खुलासा झाला की राशिदही पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी संपर्कात होता. तर रजकभाई कुम्हार हा एजंट गुजरातमधील पश्चिम कच्छ येथील आहेत. दोघे एकमेकांशी जोडलेले आहेत.
6 एप्रिल रोजी एनआयएने यूपीए आणि आयपीसी अंतर्गत गुन्हा देखील दाखल केला होता. राशिदने आयएसआयला भारतातील संवेदनशील आणि रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या आस्थापनांची छायाचित्रे पाठवल्याचेही तपासात समोर आले आहे. राशिद याने पाकिस्तानस्थित आयएसआयच्या हँडलर्ससह सशस्त्र दलांच्या कारवायांची माहितीही शेअर केली. त्याने दोनदा पाकिस्तानलाही भेट दिली आहे.
एनआयएने सांगितले की, तपासणीदरम्यान रजकभाई आयएसआय एजंट म्हणून काम करत असल्याचे उघड झाले आहे. रजकभाई कुम्हार यांनी पेटीएमच्या माध्यमातून रिझवान नावाच्या व्यक्तीला त्याच्या खात्यात ५,००० रुपये ट्रान्सफर केले होते, रिझवानने ही रक्कम राशिदला पाठविली. हे काम आयएसआय एजंटच्या सूचनेनुसार केले गेले.
आयएसआयकडे भारताच्या संरक्षण आस्थापनांची माहिती पाठविण्याच्या बदल्यात राशिदला हे पैसे मिळाले. एनआयए आता या प्रकरणाची सविस्तर चौकशी करीत आहे. यासंदर्भात गुरुवारी एनआयएने कच्छ येथील रजकभाई याच्या घरावर छापा टाकण्यात आला.
अन्य महत्वाच्या बातम्या...
सुशांत आत्महत्येच्या तपासातील पोलीस अधिकाऱ्याला कोरोना; CBI पथकाचीही होणार टेस्ट
संदीप सिंहच्या चौकशीसाठी आलेल्या तक्रारी सीबीआयकडे पाठवणार, अनिल देशमुखांनी दिली माहिती