ISIS चं मोठं रॅकेट उद्ध्वस्त, NIA ची २० ठिकाणी छापेमारी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 03:50 PM2020-02-24T15:50:28+5:302020-02-24T15:52:04+5:30
यामधून NIA ला महत्त्वाची माहिती हाती लागण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली - ISIS या दहशतवादी संघटनेचं मोठं रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी NIA ने कर्नाटक आणि तामिळनाडूत मोठी कारवाई केली आहे. NIA च्या पथकांनी २० ठिकाणी छापे टाकले असून संशयीत ठिकाणांवरून आक्षेपार्ह दस्ताऐवज जप्त केले आहेत. यामधून NIA ला महत्त्वाची माहिती हाती लागण्याची शक्यता आहे. कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये हे छापे टाकण्यात आले आहेत.
या आधीही NIA ने अशा प्रकारची कारवाई केली होती. केरळ आणि महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात छापे टाकले होते. NIA ने १५ फेब्रुवारीला दोन दहशतवाद्यांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. खलील अहमद कयानी (३४) आणि मोहम्मद नाझीन (२३) अशी या अटक दहशतवाद्यांची नावे आहेत. पाकव्याप्त काश्मीरमधील हवेली फरवाड कहूता जिल्ह्यातून त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या.
National Investigation Agency (NIA) is conducting raids at more than 20 locations in Karnataka and Tamil Nadu, in connection with ISIS conspiracy cases. pic.twitter.com/b48HufG62D
— ANI (@ANI) February 24, 2020