कुऱ्हाडीचे वार करुन इसमाचा खून, आरोपी स्वत:हून पोलिसात हजर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 09:25 PM2022-03-02T21:25:18+5:302022-03-02T21:27:16+5:30
साजणी येथिल सक्काणा मळा येथे नितिन कोणिरे यांची गट नंबर ११३ मध्ये २० गुंठे शेतजमीन आहे. या जमिनी मध्येच त्यांचा २ गुंठया मध्ये जनावराचा गोठा आहे
कोल्हापूर/हातकणंगले - साजणी ता. हातकणंगले येथिल सककाणा मळा येथे वीस गुंठे जमिनीच्या आर्थिक वादातून बुधवारी सकाळी ११.४० वा. कुऱ्हाडीचे सपासप वार करून मुनाफ मंदमदहुसेन सत्तारमेकर (वय ६२ रा. तिरंगा कॉलनी कबनूर) यांचा खून झाला. यातील संशयित हल्लेखोर नितिन भाऊसो कोणिरे, (वय ३० रा. म्हसोबा मंदिराजवळ साजणी) हा स्वतःहून हातकणंगले पोलिसांत हजर झाला आहे. या खूनाचा गुन्हा हातकणंगले पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.
साजणी येथिल सक्काणा मळा येथे नितिन कोणिरे यांची गट नंबर ११३ मध्ये २० गुंठे शेतजमीन आहे. या जमिनी मध्येच त्यांचा २ गुंठया मध्ये जनावराचा गोठा आहे. नितिन कोणिरे यांने आपल्या शेतजमिनीवर फायनान्स कंपनी कडून कर्ज घेतले होते. कर्जाची रक्कम वेळेत परतफेड केली नसल्याने कर्जाच्या वसूलीसाठी फायनान्स कंपनीने या शेतजमीनीचा लिलाव करणेत आला. फायनान्स कंपनीच्या लिलावा मध्ये ही शेतजमीन पांच वर्षापूर्वी मुनाफ सत्तारमेकर यांनी फायनान्स कंपनी कडून खरेदी केली घेतली होती.
मुनाफ सत्तारमेकर यांनी खरेदी केलेल्या जमिन मध्येच नितिन कोणिरे यांचा दोन गुंठे जनावराचा गोठा होता. जनावराचा गोठा काढुन घेण्यावरून दोघामध्ये वारंवार वाद सूरु होता. या जमिनीचा वाद न्यायप्रविष्ठ आहे. स्थानिक पातळीवर एक-दोन वेळा हा वाद मिटवण्याचा प्रयत्नही झाला होता. बुधवारी सकाळी ११.४० वा सुमारास मुनाफ सत्तारमेकर आणि नितीन कोणिरे यांच्या मध्ये जनावराचा गोठा काढून घेण्या वरुन वाद झाला. यावेळी नितिन ने आपल्या हातातातील कुऱ्हाडीने मुनाफ सत्तारमेकर यांच्या छातीवर, खांदयावर आणि मानेवर कुऱ्हाडीने सपासप वार करून जागेवरच त्यांचा खून केला. आणि स्वता हातकणंगले पोलिसात हजर होवून घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच हातकणंगलेचे पोलिस निरिक्षक के. एन. पाटील सहकाऱ्यां सह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनांस्थळाचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदना साठी हातकणंगले ग्रामिण रुग्णालयात हलविणेत आला . इचलकरंजी विभागाचे पोलिस उपअधिक्षक बी.बी. महामुनी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासां बाबत सूचना दिल्या. या खूनाचा गुन्हा हातकणंगले पोलिस ठाण्यात दाखल झाला असून महिला सहाय्यक पोलीस निरिक्षक शंकुतला वागलगावे गुन्हयाचा तपास करत आहेत.