Nirbhaya Case : नवं डेथ वॉरंट जारी करा! असं म्हणत निर्भयाच्या आईने कोर्टात फोडला टाहो
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 03:14 PM2020-02-12T15:14:50+5:302020-02-12T15:17:45+5:30
इतर दोषींनी कायद्याचा वापर करत पुन्हा दया याचिका दाखल केली.
नवी दिल्ली - दिल्लीतील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी दिल्ली कोर्टात निर्भयाच्या आईने टाहो फोडत कृपया चार दोषींविरोधात नवीन डेथ वॉरंट जारी करण्याची विनंती केली आहे. निर्भयाच्या चारही दोषींच्या फाशीच्या शिक्षेला विलंब होत असल्याने निर्भयाची आई आशादेवी यांनी काल कोर्टात धाव घेतली आणि नव्य डेथ वॉरंट काढण्यासाठी याचिका दाखल केली. आज आशादेवी कोर्टात हजर असून त्यांनी माझ्या हक्काचं काय? असा कोर्टाला सवाल केला. तसेच मी सुद्धा माणूस आहे असं म्हणत कोर्टातच टाहो फोडत खाली कोसळली.
Nirbhaya's mother breaks down in Court during hearing https://t.co/e1KCB5kmOs
— ANI (@ANI) February 12, 2020
Nirbhaya Case :...म्हणून निर्भयाच्या दोषीने सर्वोच्च न्यायालयात केली रिट याचिका दाखल
Verdict On Nirbhaya Case : निर्भयाच्या दोषींची घटिका भरली?, सर्वांना एकाच वेळी देणार फाशी
निर्भयाच्या चार दोषींविरुद्ध पहिले डेथ वॉरंट जारी करत २२ जानेवारीला फाशीची तारीख निश्चित करण्यात आली होती. नंतर दोषींनी पळवाटा काढण्यासाठी आणि फाशीची शिक्षेची अंमलबजावणीत व्यत्यय आणण्यासाठी कायद्याचा वापर करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे दुसरे डेथ वॉरंट जारी करत १ फेब्रुवारीला सकाळी 6 वाजता नराधमांना फाशी देण्यात येणार आहे. मात्र, त्यानंतर इतर दोषींनी कायद्याचा वापर करत पुन्हा दया याचिका दाखल केली. त्यामुळे पुन्हा फाशीची शिक्षेची अंमलबजावणी टळली होती.
Nirbhaya Case : निर्भयाच्या गुन्हेगारांना एकाचवेळी फासावर लकटवणार की वेगवेगळे? आज निर्णय
Delhi Court resumes hearing on plea of state&Nirbhaya's parents seeking issuance of fresh death warrant against the 4 convicts.Nirbhaya's mother in Court 'what about my rights?I am standing with folded hands.Please issue death warrant.I am also human. It’s been more than 7 years'
— ANI (@ANI) February 12, 2020