साैंदर्यवतीची पतीने केली हत्या, तुकडे करून ॲसिड ओतले; आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 09:25 IST2024-09-14T09:25:09+5:302024-09-14T09:25:32+5:30
ते लपविण्यासाठी त्यात ॲसिड मिसळून नष्ट केले. याचा उलगडा ७ महिन्यांनी झाला आहे.

साैंदर्यवतीची पतीने केली हत्या, तुकडे करून ॲसिड ओतले; आरोपीला अटक
बर्न : मिस स्वित्झर्लंड स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाेहाेचलेल्या क्रिस्टीना जाेक्सिमाेविच हिची हत्या तिचा पती थाॅमस यानेच केल्याचे उघडकीस आले आहे. तिची १३ फेब्रुवारीला राहत्या घरात अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली हाेती.
प्राप्त माहितीनुसार, थाॅमसने हत्येनंतर क्रिस्टीनाच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केले. त्यानंतर ते तुकडे त्याने ब्लेंडरमधून बारीक केले. ते लपविण्यासाठी त्यात ॲसिड मिसळून नष्ट केले. याचा उलगडा ७ महिन्यांनी झाला आहे. त्याला हत्येच्या दुसऱ्याच दिवशी अटक झाली हाेती.