अबब! मुंबईच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या नेत्यावर IT ची धाड; ७०-८० कोटी मिळाली देणगी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 04:52 PM2022-09-08T16:52:34+5:302022-09-08T16:53:36+5:30

आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील चुनाभट्टी स्टेशनसमोरील जनतावादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयावर धाड टाकली.

IT raid on Mumbai slum-dwelling leader Santosh Katke; 70-80 crore received as a party donation | अबब! मुंबईच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या नेत्यावर IT ची धाड; ७०-८० कोटी मिळाली देणगी

अबब! मुंबईच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या नेत्यावर IT ची धाड; ७०-८० कोटी मिळाली देणगी

googlenewsNext

मुंबई - देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या सायन परिसरात असणाऱ्या झोपडपट्टीत राहणारे जनतावादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संतोष कटके हे आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत. झोपडपट्टीतून चालणाऱ्या या पक्षाला जवळपास ७०-८० कोटी देणगी मिळाल्याचं उघड झाले आहे. त्यामुळे बुधवारी झोपडपट्टीत राहणाऱ्या संतोष कटके यांच्या घरी आयकर विभागानं छापा टाकला. २०१४ मध्ये संतोष कटके यांनी पक्षाची स्थापना केली होती. २०१४ ते २०२२ या कालावधीत संतोष कटके यांच्या पक्षाला ७०-८० कोटी देणगी मिळाली आहे. 

आयकर विभागाला संशय होता की, संतोष कटके हा जनतवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा करत होता. बुधवारी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी संतोष कटकेच्या घरासोबत चुनाभट्टी येथील कार्यालयावरही छापा टाकला. यावेळी संतोषसह त्याच्या कुटुंबियांचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. सकाळी ६ च्या सुमारास आयकर विभागाची टीम संतोषच्या सायन येथील घरी पोहचली होती. 

सायन येथील ट्रान्झिट कॅम्पमध्ये संतोष कटके गेल्या २० वर्षापासून राहत आहे. संतोषच्या चौकशीत अधिकाऱ्यांनी पक्षाशी संबंधित आयकराची कागदपत्रे, देणगीशी निगडीत व्यवहार, बिले मागितली. आतापर्यंत पक्षाने किती निवडणुका लढल्या. त्यावर किती खर्च झाला आणि खर्च केल्यानंतर किती पैसा उरला आहे. उरलेले पैसे कुठे आहेत असे विविध प्रश्न चौकशीत विचारण्यात आले. 

आयकर विभागाचा धाड हे षडयंत्र 
आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील चुनाभट्टी स्टेशनसमोरील जनतावादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयावर धाड टाकली. १० बाय १० फूटाचं हे कार्यालय संतोषनं भाड्याने घेतले आहे. मात्र आयकर विभागाच्या कारवाईवर आरोप करत हे षडयंत्र असल्याचा दावा संतोषनं पत्रकारांशी बोलताना केला. संतोष कटके म्हणाला की, माझ्याविरोधात षडयंत्र रचलं जात आहे. मी निवडणूक आयोगाकडे माझ्या पक्षाशी निगडीत कागदपत्रे आणि पैशांचा हिशोब पाठवला. त्यानंतर काही महिन्यात माझ्या घरावर ही छापेमारी करण्यात आली. हे सगळं ठरवून केले आहे. आयकर विभागाला माझ्या घरी काहीच सापडलं नाही. माझी सगळी कागदपत्रे क्लिअर आहेत. त्यामुळे माझ्यावर पुढील कारवाई केली नाही असा दावा त्याने केला. 
 

Web Title: IT raid on Mumbai slum-dwelling leader Santosh Katke; 70-80 crore received as a party donation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.