कुन्नूर हेलिकॉप्टर दुर्घटनेवर आक्षेपार्ह पोस्ट लिहिणं पडलं महागात; पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 08:57 PM2021-12-11T20:57:35+5:302021-12-11T20:58:53+5:30
Crime News : हेलिकॉप्टर अपघाताबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट शेअर करणाऱ्या एका व्यक्तीला अहमदाबाद पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने अटक केली आहे. शिवाभाई अहिर असे अटक आरोपीचे नाव आहे.
तमिळनाडूतील कुन्नूर येथील वेदनादायक हेलिकॉप्टर अपघाताबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट शेअर करणाऱ्या एका व्यक्तीला अहमदाबादपोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने अटक केली आहे. शिवाभाई अहिर असे अटक आरोपीचे नाव आहे.
भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्यासह १३ जण या हेलिकॉप्टर अपघातात मृत्यूमुखी पडल्याबद्दल सोशल मीडियावर अपशब्द वापरणाऱ्या गुजरातमधील रहिवासी शिवभाई अहिर याला अहमदाबादपोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने अटक केली आहे. सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाल्याबद्दल शिवभाई यांनी मनोहर पर्रीकर आणि अजित डोवाल यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लिहिली होती.
नक्षलवाद्यांचा मोठा कट उधळला, पोलिसांनी जंगलात लपवून ठेवलेली स्फोटके-शस्त्रे केली जप्त
या पोस्टनंतर अहमदाबाद सायबर क्राइम ब्रँचने अमरेली येथून शिवभाई अहिर नावाच्या व्यक्तीला अटक केली. डीसीपी (सायबर क्राईम) अमित वसावा यांच्या म्हणण्यानुसार, शिवभाईने सोशल मीडियावर अशी टिप्पणी करण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही तो सोशल मीडियावर अशा अनेक आक्षेपार्ह गोष्टी लिहित आहे. सोशल मीडियावरही त्यांनी पंतप्रधानांबद्दल देखील भाष्य केले होते.