ज्येष्ठ नागरिकाला डेटिंगसाठी मुली मागविणे पडले महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 02:05 AM2020-10-12T02:05:28+5:302020-10-12T02:05:53+5:30
Online Fraud Case News: या प्रकरणी क्वार्टर गेट येथे राहणाऱ्या ६८ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाने सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली.
पुणे : एका ६८ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकास डोटंगसाठी मुली मागविणे चांगलेच महागात पडले़ सायबर चोरट्यांनी त्यांना आपल्या जाळ्यात ओढून तब्बल पावणेचार लाख रुपयांना गंडा घातला आहे़
या प्रकरणी क्वार्टर गेट येथे राहणाऱ्या ६८ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाने सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली. हा प्रकार १३ जुलैपासून सुरू होता़ फिर्यादी हे घरी असताना त्यांना एक फोन आला़ त्यांना डेटिंगसाठी मुली पुरविण्याचे आश्वासन दिले़ त्यासाठी त्यांना वेगवेगळी कारणे सांगून त्यांना एका साईटवर रजिस्ट्रेशन करायला सांगितले़ त्यासाठी त्यांना एका बँक खात्यात पैसे पाठविण्यास सांगण्यात आले़ त्यांनी पैसे पाठविल्यानंतर त्यांना दुसºया मोबाइल फोन वरुन संपर्क साधण्यात आला़ तुम्ही आता रजिस्ट्रेशन केले असल्याने तुमच्यावर पोलीस गुन्हा दाखल करतील, अशी भीती दाखवली. हे रजिस्ट्रेशन रद्द करायचा असेल तर आणखी पैसे पाठविण्यास भाग पडले़ अशा प्रकारे त्यांच्याकडून तब्बल ३ लाख ७४ हजार रुपये बँक खात्यावर भरण्यास भाग पाडले़ त्यानंतरही आणखी पैशांची मागणी केली जाऊ लागली़ तेव्हा त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली़ सायबर पोलिसांनी प्राथमिक तपास केल्यानंतर हा गुन्हा समर्थ पोलिसांकडे वर्ग केला आहे़