दारु विक्रेत्यानेच पोलिसाला अडकविले एसीबीच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 03:10 PM2021-06-23T15:10:35+5:302021-06-23T15:17:37+5:30

ACB trap : पाळधी दूरक्षेत्रातील  प्रकार; कारवाई न करण्यासाठी अडीच हजाराची लाच

It was the liquor dealer who caught the police in the ACB's trap | दारु विक्रेत्यानेच पोलिसाला अडकविले एसीबीच्या जाळ्यात

दारु विक्रेत्यानेच पोलिसाला अडकविले एसीबीच्या जाळ्यात

Next
ठळक मुद्देयाप्रकरणी दोघांविरुध्द धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. होमगार्ड प्रशांत नवल सोनवणे याने सपकाळे याच्या सांगण्यावरुन अडीच हजार रुपये स्विकारताच त्याला पकडण्यात आले.

जळगाव :  अवैध धंदे चालक व पोलीस यांच्यातील संबंध सर्वशृत आहेत. अशाच एका अवैध दारु विक्रेत्याने पोलीस अमलदार हवालदार व होमगार्डची व्हीकेट घेतली आहे. दारु विक्रीच्या व्यवसायावर कारवाई करु नये यासाठी अडीच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पाळधी दूरक्षेत्राचा पोलीस अमलदार किरण चंद्रकांत सपकाळे (वय ३७,रा.संत मिराबाई नगर, पिंप्राळा) व होमगार्ड प्रशांत नवल सोनवणे (वय २५, रा.सोनवद, ता.धरणगाव) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी पाळधी दुपारी दूरक्षेत्रातच रंगेहाथ पकडले. याप्रकरणी दोघांविरुध्द धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदसर, ता.धरणगाव येथील ५५ वर्षीय तक्रारदार याचा गावात अवैध गावठी दारु विक्रीचा व्यवसाय आहे. दारु अड्डयावर पोलिसांनी कारवाई करु नये तसेच तक्रारदारावर दाखल असलेल्या गुन्हयातील वॉरंटामध्ये मदत करावी यासाठी धरणगाव पोलीस ठाणे अतंर्गत येणाऱ्या पाळधी दूरक्षेत्राचा अमलदार किरण सपकाळे याने अडीच हजार रुपयांची मागणी केली होती.

 

या दारु विक्रेत्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सतीश भामरे यांची भेट घेऊन तक्रार केली. त्यानुसार भामरे यांनी लाच मागणीची पडताळणी केली व बुधवारी पाळधी दूरक्षेत्रातच पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, नीलेश लोधी, सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, हवालदार अशोक अहीरे, सुनील पाटील,  रवींद्र घुगे, मनोज जोशी, सुनील शिरसाठ, जनार्धन चौधरी, प्रविण पाटील, नासिर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदीप पोळ व महेश सोमवंशी यांना सोबत घेऊन सापळा रचला. होमगार्ड प्रशांत नवल सोनवणे याने सपकाळे याच्या सांगण्यावरुन अडीच हजार रुपये स्विकारताच त्याला पकडण्यात आले. दोघांना अटक करण्यात आली असून धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करुन दोघांना जळगावात आणण्यात आले.

Web Title: It was the liquor dealer who caught the police in the ACB's trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.