तस्करीसाठी त्याने गिळलं तब्बल १३ कोटी रुपयांचं कोकीन, असा झाला उलगडा

By मनोज गडनीस | Published: September 3, 2022 06:45 PM2022-09-03T18:45:56+5:302022-09-03T18:46:57+5:30

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घाना येथून २८ ऑगस्ट रोजी एक प्रवासी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला

It was revealed that he swallowed cocaine worth Rs 13 crore for smuggling | तस्करीसाठी त्याने गिळलं तब्बल १३ कोटी रुपयांचं कोकीन, असा झाला उलगडा

तस्करीसाठी त्याने गिळलं तब्बल १३ कोटी रुपयांचं कोकीन, असा झाला उलगडा

googlenewsNext

मुंबई - कोकेन पकडले जाईल या भीतीने त्याच्या तब्बल ८७ गोळ्या करून त्या गिळून पोटात ठेवणाऱ्या एका प्रवाशाला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने अटक केली आहे. या कोकेनची किंमत १३ कोटी रुपये इतकी आहे. याप्रकरणातील आरोपीला पोलिसांनीच रुग्णालयात दाखल केल होते, त्यांनंतरच हा प्रकार उघडकीस आला.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घाना येथून २८ ऑगस्ट रोजी एक प्रवासी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला. या व्यक्तीकडे अंमलीपदार्थ असल्याची माहिती कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने त्याला थांबवून त्याची झडती घेण्यात आली. मात्र, त्यावेळी त्याच्याकडे कोणतेही अंमलीपदार्थ आढळले नाहीत. पण, त्याची प्रकृती ठिक न वाटल्यामुळे त्याला अधिकाऱ्यांनी एका रुग्णालयात दाखल करून त्याची वैद्यकीय तपासणी केली. या तपासणी दरम्यान, त्याने कोकेनच्या ८७ कॅप्सूल गिळल्याची बाब पुढे आली. या ८७ गोळ्यांमधे त्याने तब्बल १३०० ग्रॅम कोकेन लपविले होते. गेल्या तीन दिवसांपासून त्या गोळ्या त्याच्या पोटातून काढण्यात आल्या असून, त्याच्यावर आता अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे.
 

Web Title: It was revealed that he swallowed cocaine worth Rs 13 crore for smuggling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.