20 वर्षांपासून फरार असलेल्या एका गँगस्टरला Google च्या मदतीने पाठवले तुरुंगात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 11:08 AM2022-01-06T11:08:41+5:302022-01-06T11:09:16+5:30
Italian mafia fugitive arrested in Spain : गुगल मॅप्स स्ट्रीट व्ह्यूचे फोटो शोधत असताना, पोलिसांना मोस्ट वाँटेड गँगस्टर (Most Wanted Gangster) एका दुकानाबाहेर उभा असल्याचे दिसले. त्यानंतर पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता त्याला अटक केली.
रोम : जवळपास 20 वर्षांपासून इटालियन पोलिसांच्या (Italy Police) डोळ्यात धूळफेक करणारा एक गुन्हेगार गुगलमुळे (Google) तुरुंगात पोहोचला आहे. दरम्यान, गुगल मॅप्स स्ट्रीट व्ह्यूचे फोटो शोधत असताना, पोलिसांना मोस्ट वाँटेड गँगस्टर (Most Wanted Gangster) एका दुकानाबाहेर उभा असल्याचे दिसले. त्यानंतर पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता त्याला अटक केली.
'डेली स्टार यूके'च्या रिपोर्टनुसार, गुन्हेगार Gioacchino Gammino याला हत्येच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले होते, परंतु तो 2002 मध्ये रोममधील तुरुंगातून पळून जाण्यात यशस्वी झाला. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. अलीकडे, गुगल स्ट्रीट व्ह्यूचे (Google Street View) फोटो पाहत असताना, पोलिसांनी Gioacchino Gammino एका दुकानाबाहेर उभा असल्याचे पाहिले. Gioacchino Gammino हा नव्या नावाने स्पेनमध्ये नवीन आयुष्य जगत होता. तसेच, त्याने स्पेनमध्येही एक दुकान उघडले होते.
गुन्हेगार Gioacchino Gammino ने आपले नाव बदलून Manuel असे ठेवले होते आणि किराणा दुकान चालवण्यास सुरुवात केली. याशिवाय, त्याने एका रेस्टॉरंटमध्ये शेफ म्हणूनही काम केले. Gioacchino Gammino जेव्हा त्याच्या दुकानाबाहेर कोणाशी बोलत होता तेव्हा त्याचा चेहरा गुगल स्ट्रीट व्ह्यू फोटोमध्ये कैद झाला होता आणि त्याआधारे पोलिस त्याच्यापर्यंत पोहोचू शकले. Gioacchino Gammino ला पुन्हा कारागृहात आणण्यात आले असून आता तो जन्मठेपेची शिक्षा पूर्ण करणार आहे.
जखमेच्या खुणेवरून ओळख पटली
पोलिसांनी सांगितले की, जेव्हा गुगल स्ट्रीट व्ह्यूमध्ये मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराचा फोटो दिसला. त्यावेळी त्याचा बारकाईने अभ्यास करण्यात आला. कारण, ज्याचा गेल्या 20 वर्षांपासून शोध घेतला जात होतो, हा तोच आहे का, स्पष्ट करण्यासाठी. यादरम्यान गुन्हेगाराच्या हनुवटीवर जखमेची खूण दिसली, त्यामुळे त्याची ओळख पटली. 17 डिसेंबरला, जेव्हा पोलीस गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोहोचले तेव्हा त्यालाही आश्चर्य वाटले. अखेर त्याचा नवा ठावठिकाणा पोलिसांना कसा कळला ते समजले नाही. त्याने पोलिसांना विचारले, 'माझा ठिवठिकाणा कसा लागला? मी 10 वर्षांपासून माझ्या घरच्यांशीही बोललो नाही'.