"ही तर एका ड्रग अॅडिक्ट आणि मानसिक आजार असलेल्या व्यक्तीशी प्रेम केल्याची शिक्षा"
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 05:42 PM2020-09-08T17:42:44+5:302020-09-08T17:43:13+5:30
Sushant Singh Rajput Case : नेक वर्षांपासून मानसिक आरोग्याने ग्रासलेल्या आणि ड्रग्ज सेवनाने आत्महत्या केलेल्या एका व्यसनाधीनतेच्या प्रेमात पडल्यामुळे तिला ही शिक्षा भोगावी लागली.
सुशांत सिंग राजपूत प्रकरणाशी संबंधित ड्रग्स प्रकरणात एनसीबीने रिया चक्रवर्ती हिला अखेर अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, रियाला दुपारी 3.45 वाजता अधिकृतपणे अटक करण्यात आली. तिच्या कुटुंबियांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. यानंतर तिची सायन रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली जात आहे आणि तिला पुन्हा एनसीबी कार्यालयात आणले जाईल. यानंतर रियाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर केले जाईल. रियाच्या अटकेवर तिचे वकील सतीश मानेशिंदे म्हणाले की, अनेक वर्षांपासून मानसिक आरोग्याने ग्रासलेल्या आणि ड्रग्ज सेवनाने आत्महत्या केलेल्या एका व्यसनाधीनतेच्या प्रेमात पडल्यामुळे तिला ही शिक्षा भोगावी लागली. ही न्यायाची विडंबना आहे. ती गेली अनेक वर्ष ५ प्रसिद्ध डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार करून घेत त्याची काळजी घेत होती. एका महिलेच्या मागे तीन - तीन केंद्रीय संस्था तपासासाठी आहेत.
दुसरीकडे, सूत्रांनी सांगितले की, रिया सहकार्य करीत आहे, म्हणून जेव्हा आवश्यक असेल तेव्हा तिची विचारपूस केली जाईल. रियाने एनसीबीला सांगितले आहे की जेव्हा जेव्हा त्याला चौकशीसाठी बोलावले जाते तेव्हा ते पुढे येण्यास तयार असेल. एनसीबी सूत्रांचे म्हणणे आहे की, रिया ही हार्डकोर गुन्हेगार नाही. चौकशीत तीन दिवस सहकार्य केले. त्यामुळे आम्ही रिमांडची मागणी करणार नाही. यापुढे गरज भासल्यास चौकशी बोलावण्यात येईल. त्यामुळे कोर्ट तिला न्यायालयीन कोठडी सुनावू शकते.
या प्रकरणात रिया दोषी आढळल्यास एनडीपीसी कायद्यानुसार कलम 20 बी अंतर्गत 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. कलम 27 अंतर्गत एक वर्षाची शिक्षा होण्याची तरतूद आहे. कलम 22 अंतर्गत 10 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.
Travesty of justice. 3 central agencies hounding a single woman just because she was in love with a drug addict who was suffering from mental health issues for several yrs & committed suicide due to consumption of illegally administered medicines, drugs: #RheaChakraborty's lawyer
— ANI (@ANI) September 8, 2020
#RheaChakraborty will be produced before a magistrate via video conferencing by 7.30 pm today: KPS Malhotra, Deputy Director, Narcotics Control Bureau (NCB) https://t.co/8TnnTa0hSh
— ANI (@ANI) September 8, 2020
अन्य महत्वाच्या बातम्या...
मुंबईची तुलना POK शी करणं कंगनाला भोवणार?, सामान्य मुंबईकराची पोलीस ठाण्यात तक्रार
मातोश्री उडवून देण्याच्या धमकीनंतर दाऊद इब्राहिमच्या प्रतिमेचे एनएसयूआयतर्फे दहन
वेगळं वळण : रियाने सुशांतच्या बहिणीविरोधात केली मुंबई पोलिसात तक्रार, हे आहे कारण!
खळबळजनक! पोलिसांसमोरच हत्येच्या आरोपीची जमावाने मरेपर्यंत केली मारहाण
रियाने केला मोठा खुलासा, २५ बॉलिवूड सेलिब्रिटींना NCB चौकशीसाठी बोलावण्याचा तयारीत