जे. जे. रुग्णालयात डॉक्टरचा वॉर्डबॉयने केला विनयभंग; पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 04:57 PM2020-06-29T16:57:50+5:302020-06-29T16:58:58+5:30
जे. जे. रुग्णालयात पीडित शिकाऊ डॉक्टर म्हणून काम करते. रुग्णालयातील एका वॉर्डबॉयने तिची छेड काढली.
मुंबई - जे. जे. रुग्णालयात धक्कादायक प्रकार घडला आहे. एका शिकाऊ महिला डॉक्टरची वॉर्डबॉयने छेड काढली आहे. या प्रकरणी जे जे मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी वॉर्डबॉयला अटक केली आहे. कोरोनाच्या संकटकाळात डॉक्टर, आरोग्य सेवक अहोरात्र रुग्णांची सेवा करत आहेत. अशावेळी रुग्णालयातच महिला डॉक्टरचा विनयभंग होत असल्याची घटना चिंताजनक आहे.
जे. जे. रुग्णालयात पीडित शिकाऊ डॉक्टर म्हणून काम करते. रुग्णालयातील एका वॉर्डबॉयने तिची छेड काढली. हा धक्कादायक प्रकार शनिवारी रात्री घडला. ३० वर्षीय शिकाऊ महिला डॉक्टर नाईट शिफ्टमध्ये काम करत होती. त्यावेळी ४५ वर्षीय वॉर्डबॉय मागून आला आणि त्याने या डॉक्टरला पकडून, तिची छेडछाड केली. याप्रकाराने भेदरलेल्या डॉक्टरने मदतीसाठी आरडाओरड केल्यानंतर, हा प्रकार उघडकीस आला. यानंतर डॉक्टरांनी वरिष्ठांना कळवल्यानंतर, वरिष्ठांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधून आरोपीवर कायदेशीर केली.त्यावरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी वॉर्डबॉयविरोधात भा. दं. वि. कलम ३५४, ३५४ (ड), ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
काही दिवसांपूर्वीच क्वारंटाइन सेंटरमध्ये एका तरुणीची दोघांनी छेड काढल्याची घटना घडली होती. मालाड परिसरातील क्वारंटाईन सेंटरमध्ये असाच धक्कादायक प्रकार घडला होता. कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगून तिला क्वारंटाईन सेंटरला बोलावले होते. त्यानंतर तेथे काम करत असलेल्या दोघांनी तिची छेड काढली होती. या प्रकरणी चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. १५ जून रोजी ही घटना घडली होती.
आरोपी वॉर्डबॉयविरोधात याआधीही अनेक तक्रारी आहेत. त्याची वर्तणूक चांगली नसल्याचे समोर आले आहे. याआधीही लोकांना शिवीगाळ, मारहाण केल्याच्या तक्रारी त्याच्याविरोधात करण्यात आलेल्या आहेत. अनेकांनी रुग्णालय व्यवस्थापन आणि पोलिसांकडेही तक्रारी केल्या आहेत. या आरोपीविरोधात अन्य कोणत्या पोलीस ठाण्यांमध्ये कोणता गुन्हा दाखल आहे का, याची चौकशी पोलीस करत आहेत.
मुंबई - जे. जे. रुग्णालयात धक्कादायक प्रकार घडला आहे. एका शिकाऊ महिला डॉक्टरची वॉर्डबॉयने छेड काढली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी वॉर्डबॉयला अटक केली आहे. pic.twitter.com/XEGwCh3P2A
— Lokmat (@MiLOKMAT) June 29, 2020
अन्य महत्वाच्या बातम्या...
५ प्रेमविवाहानंतर पतीचा दुर्दैवी अंत; पहिल्या पत्नीनेच १ कोटींची सुपारी देऊन काढला काटा
लग्न सोहळ्यात वादग्रस्त हळदी समारंभामुळे आले विघ्न, तिघांवर गुन्हा दाखल
हृदयद्रावक! बंद फ्लॅटमध्ये दाम्पत्याची आत्महत्या; पोलिसांनी दरवाजा उघडताच ८ महिन्यांचे बाळ दिसले रांगताना
बापरे! आई आणि मुलाच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून सावत्र बापाने केली मुलाची हत्या
भारत-पाकिस्तान सीमेवर PMAYच्या घरासाठी खोदकाम सुरू होते; लोखंड पाहून मजुरांना घामच फुटला
नवऱ्याने टीव्ही दिला नाही म्हणून पत्नीने पोटच्या मुलांना विष पाजले; आत्महत्येचा प्रयत्न
सोयाबीन बोगस बियाणे प्रकरणी 'ईगल'वर फसवणुकीचा गुन्हा दाखल
थरारक! घरासमोर जाऊन टोळक्याने गुंडाची चाकू भोसकून हत्या