जे. जे. रुग्णालयातच शस्त्रक्रिया करा, अनिल देशमुखांना दिलासा देण्यास कोर्टाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 02:50 PM2022-05-13T14:50:09+5:302022-05-13T16:43:23+5:30

Anil Deshmukh Case : खासगी रुग्णालयाऐवजी जे. जे. रुग्णालयामध्ये खांद्यावर शस्त्रक्रिया करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. 

J. J. Surgery in hospital, court refuses to grant relief to Anil Deshmukh | जे. जे. रुग्णालयातच शस्त्रक्रिया करा, अनिल देशमुखांना दिलासा देण्यास कोर्टाचा नकार

जे. जे. रुग्णालयातच शस्त्रक्रिया करा, अनिल देशमुखांना दिलासा देण्यास कोर्टाचा नकार

googlenewsNext

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेण्याची परवानगी मागणाऱ्या याचिकेला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी विरोध केला. जे. जे. रुग्णालयातही देशमुख यांना खासगी रुग्णालयाप्रमाणेच उपचार मिळतील, असे ईडीने प्रतिज्ञापत्रात म्हटले होते.त्यावर आज पुन्हा सुनावणी पार पडली. त्यावेळी अनिल देशमुखांना दिलासा देण्यास विशेष न्यायालयाचा नकार दिला आहे. तर खासगी रुग्णालयाऐवजी जे. जे. रुग्णालयामध्ये खांद्यावर शस्त्रक्रिया करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. 

 

देशमुख यांच्यावर उपचार केलेल्या जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता, परंतु आपत्कालीन परिस्थितीत तसे करण्याची गरज नाही, असे ईडीने प्रतिज्ञापत्रात म्हटले होते. आपल्या निवडीच्या डॉक्टरांकडून उपचार घेणे, हा मंत्र्यांचा अधिकार आहे, असा युक्तिवाद देशमुख यांचे वकील अनिकेत निकम यांनी केला होता. त्यावर न्यायालयाने या याचिकेवरील निर्णय मंगळवारपर्यंत राखून ठेवला होता. त्यावर आज निर्णय दिला आहे. 

Web Title: J. J. Surgery in hospital, court refuses to grant relief to Anil Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.