'तू आता माझ्याजवळ ये, म्हणून मी जात आहे' असं सुसाईड नोटमध्ये लिहून जैन मुनीने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 18:34 IST2021-05-20T17:44:09+5:302021-05-20T18:34:29+5:30
Jain Priest committed Suicide : याबाबत पंतनगर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

'तू आता माझ्याजवळ ये, म्हणून मी जात आहे' असं सुसाईड नोटमध्ये लिहून जैन मुनीने केली आत्महत्या
मुंबई - मुंबईच्याघाटकोपरयेथील पंतनगर परिसरात एका जैन मुनीने मंदिर परिसरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी पहाटे उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. याबाबत पंतनगर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मनोहर मुनी महेंद्र प्राणलाल देसाई असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून ते ७० वर्षाचे होते. देसाई यांच्या मृतदेहाजवळ पोलिसांना एक सुसाइड नोट सापडली असून त्यात 'मला माझ्या गुरूने स्वप्नात येऊन सांगितले की, सर्व सामान्यांची सेवा बस झाली, तू आता माझ्याजवळ ये, म्हणून मी जात आहे' असं सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात नेण्यात आला. याप्रकरणी घाटकोपरच्या पंत नगर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शऱजील उस्मानीविरोधात आक्षेपार्ह ट्वीट केल्याप्रकरणी FIR दाखल https://t.co/OyErULDzPU
— Lokmat (@MiLOKMAT) May 20, 2021