लुडो खेळण्यापासून रोखल्यानं दोन बहिणींनी घर सोडलं; हैदराबाद गाठलं, मुंबईत करायची होती नोकरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2022 10:49 AM2022-11-06T10:49:33+5:302022-11-06T10:51:09+5:30

राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये दोन मुलींच्या ऑनलाइन गेमच्या व्यसनामुळे त्यांच्या वडिलांना भीषण अनुभवाला सामोरं जावं लागलं आहे.

jaipur news two sisters ran away from home after being stop playing ludo game reached hyderabad | लुडो खेळण्यापासून रोखल्यानं दोन बहिणींनी घर सोडलं; हैदराबाद गाठलं, मुंबईत करायची होती नोकरी!

लुडो खेळण्यापासून रोखल्यानं दोन बहिणींनी घर सोडलं; हैदराबाद गाठलं, मुंबईत करायची होती नोकरी!

googlenewsNext

राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये दोन मुलींच्या ऑनलाइन गेमच्या व्यसनामुळे त्यांच्या वडिलांना भीषण अनुभवाला सामोरं जावं लागलं आहे. वडिलांनी आपल्या दोन अल्पवयीन मुलींना लुडो गेम खेळण्यापासून रोखलं. याचा मुलींना इतका राग आला की त्यांनी मध्यरात्री कुणालाही न सांगता घर सोडलं. 

जयपूरच्या मुहाना मंडीतील एका फळ विक्रेत्यानं आपल्या दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ४ दिवसांच्या शोधानंतर दोन्ही अल्पवयीन मुली अहमदाबाद स्टेशनवर सापडल्या. लुडो गेम खेळण्यापासून वडील रोखत असल्यानं मुली नाराज झाल्या आणि याच गेमच्या माध्यमातून ओळख झालेल्या मित्रांना भेटण्यासाठी त्या घरातून पळून गेल्या. जयपूरच्या मुहाना पोलिसांनी अहमदाबाद जीआरपी पोलिसांच्या मदतीने दोघांना मुंबईला जात असताना स्टेशनवर पकडलं. यापूर्वी दोघीही हैदराबादला गेल्या होत्या.

२९ ऑक्टोबर रोजी मुहाना मंडीतून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर पोलीस सतत शोध मोहीम राबवत होते. त्याचवेळी अनुक्रमे १६ व १४ वर्षांच्या या दोन मुली २८ ऑक्टोबरच्या रात्रीपासून घरातून बेपत्ता असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं होतं. रात्री दीड वाजेपर्यंत दोघांनाही हॉलच्या बाहेर झोपलेलं पाहिल्याचं वडिलांनी सांगितलं, त्यानंतर पहाटे पाचच्या सुमारास दोघेही बेपत्ता झाल्या होत्या.

लुडोसाठी घर सोडलं
ऑनलाइन लुडो गेम खेळल्यावरुन घरात वडिलांसोबत वाद झाल्यानं हैदराबाद आणि मुंबईतील आपल्या मित्रांना भेटायला गेल्याचं पोलिसांच्या चौकशीत दोन्ही मुलींनी सांगितलं. घरातून बाहेर पडताना त्यांनी गेमशी संबंधित मित्रांशी संपर्क साधला आणि हैदराबाद आणि मुंबईला जाण्याचा प्लॅन बनवल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. दोन्ही मुलींनी घरातून सुमारे साडेतीन हजार रुपये घेतले आणि आधी हैदराबाद गाठलं. त्याचवेळी दोघीही ऑनलाइन लुडो गेम खेळणाऱ्या त्यांच्या मित्राच्या घरी पोहोचल्या, त्यानंतर दोघांनीही तिथे राहण्यासाठी भाड्याने खोली पाहण्याचा प्रयत्न केला.

इन्स्टाग्राम मेसेजनं पकडलं
दरम्यान, लुडो खेळणाऱ्या मैत्रिणींच्या मोबाईलवरून एका मुलीनं तिच्या मावशीला १ नोव्हेंबरला इन्स्टाग्रामवर मेसेज केला, त्यानंतर काकूने बेपत्ता भाचीच्या मेसेजची माहिती पोलिसांना दिली आणि पोलिसांनी मेसेजवरून लोकेशनची माहिती गोळा केली. लोकेशनच्या आधारे पोलिसांचं एक पथक हैदराबादला पोहोचलं पण यादरम्यान दोन्ही बहिणी ट्रेनमध्ये बसून मुंबईला जाण्याचा विचार करत होत्या. दरम्यान, लहान बहिणीला जयपूरला यायचं होतं मात्र मोठ्या बहिणीला मुंबईला जाऊन नोकरी करायची होती. दरम्यान, पोलीस त्यांचा सतत पाठलाग करत होते आणि मुंबईच्या दिशेनं निघण्यापूर्वी पोलिसांच्या पथकानं जीआरपीशी संपर्क साधून बेपत्ता झालेल्या दोन्ही अल्पवयीन बहिणींना मुंबईला जाणाऱ्या ट्रेनमधून उतरवलं आणि गुरुवारी जयपूर पोलिसांनी दोन्ही बहिणींना कुटुंबीयांच्या ताब्यात दिले.

Web Title: jaipur news two sisters ran away from home after being stop playing ludo game reached hyderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.