यूपीच्या सहारनपूरमधून दहशतवाद्याला अटक, नुपूर शर्मांची हत्या करण्याचा होता प्लॅन!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 08:15 PM2022-08-12T20:15:45+5:302022-08-12T20:16:29+5:30

jaish terrorist arrest in saharanpur : दहशतवाद्याच्या फोनची तपासणी केली असता त्यात Explosive Course Fidae Force असे शिर्षक असलेले डॉक्युमेंट सापडले.

jaish terrorist arrest in saharanpur uttar pradesh, want to kill nupur sharma | यूपीच्या सहारनपूरमधून दहशतवाद्याला अटक, नुपूर शर्मांची हत्या करण्याचा होता प्लॅन!

यूपीच्या सहारनपूरमधून दहशतवाद्याला अटक, नुपूर शर्मांची हत्या करण्याचा होता प्लॅन!

googlenewsNext

सहारनपूर : उत्तर प्रदेशातएटीएसने सहारनपूरमधून जैश-ए-मोहम्मद आणि तहरीक-ए-तालिबानशी संबंधित दहशतवाद्याला अटक करून मोठा कट उधळून लावला. मोहम्मद नदीम असे या दहशतवाद्याचे नाव असल्याचे समोर आले आहे. तसेच, एटीएसच्या चौकशीदरम्यान या दहशतवाद्याने सांगितले की, पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने त्याला भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांची हत्या करण्याचे काम दिले होते.

एटीएसने एक प्रेस नोट जारी करून सांगितले की, यांसदर्भात एजन्सीला माहिती मिळाली होती की, सहारनपूरमधील गंगोह पोलिस स्टेशनच्या कुंडाकलन गावात एक व्यक्ती जैश-ए-मोहम्मद आणि तहरीक-ए-तालिबान (टीटीपी) संघटेनवर प्रभावित होऊन दहशतवादी हल्ल्याची तयारी करत  आहे. यानंतर मोहम्मद नदीमची ओळख पटवून त्याची चौकशी करण्यात आली. तहरीक-ए-तालिबानचा दहशतवादी सैफुल्ला (पाकिस्तान) याने सोशल मीडियाच्या माध्यमातून मोहम्मद नदीमला दहशतवादी हल्ल्याच्या तयारीसाठी प्रशिक्षण साहित्य पुरवले होते. याच्या मदतीने सर्व सामान गोळा करून कोणत्याही सरकारी इमारतीवर किंवा पोलिसांच्या जागेवर हल्ला करण्याचा मोहम्मद नदीमचा कट होता.

दहशतवाद्याच्या फोनची तपासणी केली असता त्यात Explosive Course Fidae Force असे शिर्षक असलेले डॉक्युमेंट सापडले. तसेच, मोहम्मद नदीमच्या फोनवरून जैश-ए-मोहम्मद आणि पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या टीटीपी दहशतवाद्यांच्या चॅट आणि ऑडिओ मेसेज मिळाले आहेत. मोहम्मद नदीमने चौकशीदरम्यान सांगितले की, व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, आयएमओ, फेसबुक मेसेंजर, क्लबहाऊस या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे 2018 पासून तो जैश-ए-मोहम्मद आणि तहरीक-ए-तालिबान-ए-पाकिस्तानच्या संपर्कात आहे. त्याने या दहशतवाद्यांकडून व्हर्च्युअल नंबर बनवण्याचे प्रशिक्षण घेतले. दहशतवादी संघटनांनी त्याला व्हर्च्युअल सोशल मीडिया आयडी बनवून 30 हून अधिक व्हर्च्युअल नंबर दिले होते.

विशेष प्रशिक्षणासाठी पाकिस्तानला जाणार होता
एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये कार्यरत असलेल्या जैश आणि टीटीपीच्या दहशतवाद्यांना विशेष प्रशिक्षण देण्यासाठी हे दहशतवादी मोहम्मद नदीमला पाकिस्तानात बोलावत होते. तो लवकरच व्हिसा घेऊन पाकिस्तानला जाणार होता. यानंतर तो इजिप्तमार्गे सीरिया आणि अफगाणिस्तानात जाण्याचा विचार करत होता. भारतातील दहशतवाद्याच्या संपर्कात आणखी काही लोक असल्याची माहिती एटीएसला मिळाली आहे. सध्या त्यांच्या अटकेसाठी एटीएसनेही कारवाई सुरू केली आहे.

Web Title: jaish terrorist arrest in saharanpur uttar pradesh, want to kill nupur sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.