जालंधरच्या कुल्हड पिझ्झा कपलचा MMS लीक; महिलेवर ब्लॅकमेलिंगचा आरोप, FIR दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 01:26 PM2023-09-23T13:26:51+5:302023-09-23T13:28:01+5:30

पंजाबमधील जालंधर येथील प्रसिद्ध कुल्हड पिझ्झा कपल गेल्या तीन दिवसांपासून चर्चेत आहे

Jalandhar s Kulhad Pizza couple s privare video leak Woman accused of blackmailing FIR filed sehaj arora gurpreet kaur | जालंधरच्या कुल्हड पिझ्झा कपलचा MMS लीक; महिलेवर ब्लॅकमेलिंगचा आरोप, FIR दाखल

जालंधरच्या कुल्हड पिझ्झा कपलचा MMS लीक; महिलेवर ब्लॅकमेलिंगचा आरोप, FIR दाखल

googlenewsNext

पंजाबमधील जालंधर येथील प्रसिद्ध कुल्हड पिझ्झा कपल (Kulhad Pizza Couple) गेल्या तीन दिवसांपासून चर्चेत आहे. सहज अरोरा आणि गुरप्रीत कौर हे कुल्हड पिझ्झा कपल म्हणून ओळखले जातात. दोघांनीही अनोखा कुल्हड पिझ्झा तयार केला होता. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या कुल्हड पिझ्झाची चर्चा सुरू होती. परंतु आता त्यांचा एक कथित व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावरुन हे जोडपं पुन्हा चर्चेत आलंय. हे प्रकरण इतकं गंभीर बनलंय की ते पोलिसांपर्यंत पोहोचलंय. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान, कुल्हड पिझ्झा कपलचा एक खाजगी व्हिडीओ व्हायरल झालाय. हा खासगी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या जोडप्याला ट्रोल करण्यात आलंय. कुल्हड पिझ्झा कपल सहज अरोरा आणि गुरप्रीत कौर यांचा खासगी व्हिडीओ कुणीतरी इंटरनेटवर शेअर केला. काही वेळातच हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. दरम्यान, यावर नेटकऱ्यांनी अश्लिल कमेंट्सही केल्याचे प्रकार घडले. दोघांनीही या प्रकरणानंतर एक व्हिडीओ जारी करून स्पष्टीकरण दिलंय. 

असे आले प्रकाशझोतात
सहज आणि गुरप्रीत दोघेही कुल्हड पिझ्झा बनवतात आणि विकतात. अलीकडेच एका फूड ब्लॉगरने त्यांचा व्हिडीओ बनवून पोस्ट केला. त्यानंतर हे जोडपं इंटरनेट विश्वात प्रसिद्ध झालं. त्यांचा कुल्हड पिझ्झा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर दोघांचीही मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.

एआय व्हिडीओ असल्याचा दावा
सहज अरोरा यांनी खासगी व्हिडीओ लीक प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. हा व्हिडिओ खोटा असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटलेय. याशिवाय हा व्हिडीओ AI जनरेटेड असल्याचा दावाही त्यांनी केलाय. सहज अरोरा यांनी पोलीस स्टेशनसमोर मीडियाशी संवाद साधला. त्यांनी जालंधर पोलिस स्टेशन क्रमांक ४ मध्ये आपली तक्रार दाखल केली.

काय म्हटलेय तक्रारीत
सहज अरोरा यांनी आपल्या तक्रारीत एक महिला आणि एका ब्लॉगरवर गंभीर आरोप केले असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या महिलेवर त्यांनी आरोप केले आहेत, तिला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आलीये. ही महिला एका ब्लॉगरच्या मदतीनं ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप सहज यांनी केलाय. सहज यांनी पोलिसांना मोबाईलवर आलेल्या काही मेसेजेसचे स्क्रीन शॉट्सही दिले आहेत.

Web Title: Jalandhar s Kulhad Pizza couple s privare video leak Woman accused of blackmailing FIR filed sehaj arora gurpreet kaur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.