120 महिलांसोबत रेप करून बनवले अश्लील व्हिडीओ, 'जलेबी बाबा'ला कोर्टाने ठरवलं दोषी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 10:35 AM2023-01-06T10:35:45+5:302023-01-06T10:48:19+5:30
Crime News : पीडित महिलांच्या तक्रारीवर या बाबाला अटक करण्यात आली होती. ही व्यक्ती बाबा बनण्याआधी एका रेल्वे स्टेशनबाहेर जलेबी विकत होती. त्यामुळे त्याला जलेबी बाबा हे नाव मिळालं.
Crime News : हरयाणाच्या फतेहाबाद जिल्ह्याच्या टोहानामध्ये बाबा बालकनाथ मंदिराचा पुजार अमरपुरी उर्फ जलेबी बाबा उर्फ बिल्लूला कोर्टाने दोषी ठरवलं आहे. दोन दिवसांनी जलेबी बाबाला शिक्षा सुनावली जाईल. जलेबी बाबावर 120 महिलांसोबत रेप करून त्यांचे अश्लील व्हिडीओ बनवल्याचा आरोप होता. पोलिसांच्या छापेमारीत 120 महिलांसोबत संबंधाचे व्हिडीओ सापडले होते. पीडित महिलांच्या तक्रारीवर या बाबाला अटक करण्यात आली होती. ही व्यक्ती बाबा बनण्याआधी एका रेल्वे स्टेशनबाहेर जलेबी विकत होती. त्यामुळे त्याला जलेबी बाबा हे नाव मिळालं.
महिलांना असं फसवत होता..
बिल्लू फारच तरबेज होता. तो महिलांना सांगत होता की, त्यांच्यावर भूतांची सावली आहे. घाबरून महिला त्याच्या बोलण्यात येत होत्या आणि भूतांपासून पिच्छा सोडवण्यासाठी जलेबी बाबाच्या तांत्रिक क्रियामध्ये सहभागी होत होता. कथितपणे बाबा तंत्र विद्या करताना महिलांना मादक पदार्थ देत होता. ज्यामुळे महिला बेशुद्ध होत होत्या. त्यानंतर बिल्लू त्यांच्यावर अत्याचार करून व्हिडीओ बनवत होता. महिलांना ब्लॅकमेल करून तो मोठी रक्कम वसूलत होता. इतकंच नाही तर महिलांना धमकी देऊन तो त्यांच्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंधही ठेवत होता.
120 व्हिडीओ
जलेबी बाबाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात तो महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवत होता. यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली होती. डीएसपीने जलेबी बाबाला अटक कऱण्याचे आदेश दिले होते.
पोलिसांनी अमरपुरी उर्फ बिल्लूला अटक करून त्याच्यावर रेप, ब्लॅकमेलिंग अशा अनेक केसेस लावल्या होत्या. पोलिसांना त्याच्याकडे 120 व्हिडीओ सापडले होते. ज्यात तो महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवताना दिसत होता. त्यासोबतच त्याच्याकडे नशेच्या गोळ्याही आढळून आल्या.
जलेबी बाबाचं खरं नाव अमरवीर आहे. तो 20 वर्षाआधी पंजाबच्या मानसाहून टोहानाला आला होता. इथे त्याने जलेबीचं दुकान लावलं. यादरम्यान त्याच्या पत्नीचं निधन झालं. नंतर आरोपी पंजाबला जाऊन तांत्रिक विद्या शिकला. दोन वर्षांनी तो पुन्हा टोहानाला आला. त्यानंतर त्याने महिलांना आपल्या जाळ्यात फसवलं आणि त्यांचं लैंगिक शोषण केलं.