जळगावात माजी महापौर ललित कोल्हेंचा जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 04:13 PM2020-07-14T16:13:44+5:302020-07-14T16:14:08+5:30
न्या.आर.एन.हिवसे यांच्या न्यायालयात त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला. सरकारतर्फे अॅड.नीलेश चौधरी यांनी कामकाज पाहिले.
Next
ठळक मुद्दे१६ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता खुबचंद साहित्या यांच्यावर हल्ला झाला होता.
जळगाव : बांधकाम व्यावासायिक खुबचंद साहित्या यांच्यावरील हल्ला प्रकरणात अटकेत असलेले माजी महापौर ललित विजय कोल्हे (४५, रा.कोल्हे नगर) यांचा जामीन अर्ज न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावला. १६ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता खुबचंद साहित्या यांच्यावर हल्ला झाला होता. या घटनेत फरार असलेल्या ललित कोल्हे यांना पाच महिन्यांनी २७ मे रोजी पोलिसांनी महाबळमधून अटक केली होती. कोल्हे सध्या गोदावरी महाविद्यालयात दाखल आहे. न्या.आर.एन.हिवसे यांच्या न्यायालयात त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला. सरकारतर्फे अॅड.नीलेश चौधरी यांनी कामकाज पाहिले.