दिल्ली हिंसाचार प्रकरणी जामिया एल्युमिनाई असोसिएशनच्या अध्यक्षाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 09:50 PM2020-04-27T21:50:14+5:302020-04-27T21:51:38+5:30
दिल्ली हिंसाचार प्रकरणी नामवंत यूनिवर्सिटी-कॉलेजमध्ये शिकलेल्या अनेक लोकांना अटक केली जात आहे.
नवी दिल्ली - दिल्ली हिंसाचार प्रकरणी जामिया एल्युमिनाई असोसिएशनचा अध्यक्ष शिफा-उर्रह्मानला अटक केली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने सोमवारी शिफा-उर्रहमानच्या मुसक्या आवळल्या. आता त्याची चौकशी करत आहेत. दिल्ली हिंसाचार प्रकरणी नामवंत यूनिवर्सिटी-कॉलेजमध्ये शिकलेल्या अनेक लोकांना अटक केली जात आहे.
याआधी स्पेशल सेलने जमिया कॉर्डिनेशन कमिटीची मिडिया प्रभारी सफुरा जर्गरला (जी तीन महिन्यांची गरोदर आहे) अटक केली होती. याव्यतिरिक्त मीरान हैदरला हिंसाचारात सामील झाल्याप्रकरणी अटक केली होती. या अटक दोघांवर यूएपीए कायद्याअंतर्गत कारवाई केली होती. सफूराने गरोदर असल्याचे कारण पुढे करत जामीन मागितला होता. मात्र, कोर्टाने फेटाळून लावली आहे.
त्याचवेळी, किरोड़ीमल कॉलेजचा माजी विद्यार्थी गुलफिसा फातिमा यांनाही हिंसाचाराच्या कटात अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरूद्ध युएपीए कायद्यांतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. जेएनयूचे माजी विद्यार्थी उमर खालिद यांच्यावरही दिल्ली हिंसाचाराच्या कटात सहभागी असल्याचा आरोप आहे. दिल्ली पोलिसांनी त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदविला आहे. या प्रकरणाची चौकशी विशेष पथक करत आहे.
यापूर्वी आम आदमी पार्टी (आप) चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन यांच्यावर यूएपीएअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिल्लीच्या चांद बाग हिंसाचार प्रकरणात ताहीर हुसेन यांना अटक करण्यात आली होती. ‘आप’च्या माजी नगरसेवकावर आयबी कर्मचारी अंकित शर्माची हत्या केल्याचा आरोप आहे. ताहीर हुसेन यांना दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. ताहीर हुसेन यांच्या घराच्या छतावर दगड आणि पेट्रोल बॉम्ब सापडले. येथून दगडफेकही करण्यात आल्याचा आरोप आहे. इतकेच नाही तर सोशल मीडियावर एक व्हिडिओही व्हायरल करण्यात आला होता, ज्यामध्ये काही हल्लेखोर घराच्या छतावरून खाली दगड आणि पेट्रोल बॉम्ब टाकत होते. नंतर पोलिसांनी हे घर सील केले होते.