...म्हणून भाजपाच्या नेत्यांनीच रचला दहशतवादी हल्ल्याचा बनाव; पोलीस तपासात धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 11:21 AM2021-07-21T11:21:25+5:302021-07-21T11:34:47+5:30
Jammu and Kashmir 2 BJP leaders arrested for faking militant attack : कुपवाडा येथे दहशतवादी हल्ला झाल्याचा बनाव केल्याप्रकरणी ही अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पोलीस चौकशीत याबाबत धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.
नवी दिल्ली - जम्मू काश्मीर पोलिसांनी (Jammu Kashmir Police) भाजपाच्या (BJP) दोन पदाधिकाऱ्यांना आणि त्यांच्या दोन खासगी सुरक्षा रक्षकांना अटक केली आहे. कुपवाडा येथे दहशतवादी हल्ला झाल्याचा बनाव केल्याप्रकरणी ही अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पोलीस चौकशीत याबाबत धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. आपल्याला पोलिसांकडून सुरक्षा पुरवण्यात यावी या हेतूने या दोघांनी दहशतवादी हल्ला झाल्याचा बनाव केल्याचं आता उघड झालं आहे. पोलिसांनी अटकेची कारवाई केल्यानंतर याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इश्फाक अहमद मीर असं अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी एकाचं नाव असून तो कुपवाडा येथील भाजपाच्या आयटी सेलचा प्रमुख आहे. पक्षाचे जिल्हा प्रवक्ते बशरत अहमद आणि आपल्या खासगी सुरक्षा रक्षकांच्या मदतीने इश्फाक यांनी दहशतवादी हल्ला झाल्याचा बनाव केला. भाजपाने इश्फाकचे वडील मोहम्मद शाफी मीर यांना पदावरुन निलंबित केल्याचं सांगितलं आहे. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत भाजपाचे कुपवारा जिल्हाध्यक्ष असणाऱ्या मोहम्मद शाफी मीर यांना पदावरुन हटवण्यात आल्याचं भाजपाने म्हटलं आहे.
धक्कादायक! पोलीस ठाण्यात पोलिसांसमोरच तरुणाला केली लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण अन्...#crime#crimesnews#Police#Indiahttps://t.co/YHIoZmWJKj
— Lokmat (@MiLOKMAT) July 19, 2021
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची संपूर्ण माहिती आम्हाला एक दोन दिवसांमध्ये मिळेल. इश्फाकवर 16 जुलै रोजी हल्ला झाल्याचं सांगण्यात आलं होतं. गुलगाम गावामध्ये मदत साहित्याचं वाटप करताना हल्ला झाल्याचं सांगण्यात आलं. या हल्ल्यामध्ये माझ्या हाताला गोळी लागल्याने मी जखमी झाल्याचंही इश्फाकने म्हटलं होतं. मात्र त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली आणि हा दहशतवादी हल्ला नसल्याचं स्पष्ट केलं. दहशतवाद्यांना प्रतिउत्तर देताना इश्फाकच्या सुरक्षा रक्षकाकडे असलेल्या बंदुकीमधून चूकून सुटलेल्या गोळीमुळे तो जखमी झाल्याचं सांगण्यात आलं.
पोलिसांनी चौकशी केली असता इश्फाक, बशरत आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी बनाव केल्याचं समोर आलं. पोलिसांकडून आपल्याला सुरक्षा मिळावी या हेतूने आपल्यावर हल्ला झाल्याचा बनाव या भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला. पोलिसांनी सुरक्षा रक्षकांची कसून चौकशी केली असता हा भयंकर प्रकार समोर आला. तसेच पक्षाच्या नेत्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी त्यांनी खोटी माहिती दिल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सैन्यात भरती होण्याचं स्वप्न पूर्ण न झाल्याने तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; गळफास घेऊन संपवलं जीवन #crime#crimesnews#Suicide#Policehttps://t.co/uENvUwfaCRpic.twitter.com/U65FSftXv0
— Lokmat (@MiLOKMAT) July 18, 2021