चिमुकलीने बापाला आत्महत्या करण्यापासून रोखले; संतापलेल्या बापाने तिचाच गळा चिरला...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 07:01 PM2023-04-03T19:01:39+5:302023-04-03T19:01:59+5:30

बापाला आत्महत्या करण्यापासून रोखले, हाच त्या 8 वर्षीय चिमुकलीचा गुन्हा.

Jammu Kashmir News; daughter stops father from committing suicide; angry father slit her throat | चिमुकलीने बापाला आत्महत्या करण्यापासून रोखले; संतापलेल्या बापाने तिचाच गळा चिरला...

चिमुकलीने बापाला आत्महत्या करण्यापासून रोखले; संतापलेल्या बापाने तिचाच गळा चिरला...

googlenewsNext


श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात एका 8 वर्षीय चिमुरडीच्या निर्घृण हत्येच्या पाच दिवसांनंतर पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. आरोपी आत्महत्या करत होता, मात्र त्याच्या मुलीने त्याला वाचवले. यामुळे संतापलेल्या आरोपीने पित्याने आपल्याच मुलीची हत्या केली. मोहम्मद इक्बाल खतना असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी मोहम्मद याला अटक केली आहे.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी इक्बाल खतना हा व्यवसायाने ड्रायव्हर असून त्याने चौकशीदरम्यान आपल्या मुलीची हत्या केल्याची कबुली दिली. बुधवारी आरोपीचे पत्नीसोबत भांडण झाले आणि तो रागाच्या भरात चाकू घेऊन घराबाहेर पडला. तो आपली कार घेऊन निघाला, त्याची मुलगीही त्याच्या कारमध्ये बसली. 

आरोपी इक्बालने मुलीला घरी सोडण्याचा प्रयत्न केला, पण त्याची मुलगी इक्बालला सोडायला तयार नव्हती. मुलीसमोर आत्महत्या करताना येणार नाही, म्हणून संतापलेल्या बापाने तिचा गळा दाबून खून केला. यानंतर त्या निर्दयी बापाने चाकूने मुलीचा गळा चिरला आणि मृतदेहाची विल्हेवाट लावली. काही तासांनंतर इक्बाल आपल्या घरी परतला.

कुटुंबीयांनी मुलीबाबत विचारले असता, ती माझ्यासोबत नसल्याचे त्याने सांगितले. पण, घरा शेजारील अनेकांनी मुलीला इक्बालसोबत जाताना पाहिले होते. यानंतर इक्बालने स्वतः पोलिस ठाण्यात जाऊन मुलगी हरवल्याची तक्रार नोंदवली. मात्र तो पोलिस ठाण्यातून परतला आणि घरी पोहोचला, इतक्यात मुलीच्या कुटुंबीयांना तिचा मृतदेह सापडला. यानंतर पोलिसांना त्याच्यावर संशय आला, त्यामुळे त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने खूनाची कबुली दिली.

Web Title: Jammu Kashmir News; daughter stops father from committing suicide; angry father slit her throat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.