अगोदर दारू पिले, संबंध ठेवले, वाद सुरू झाला, रागाच्याभरात प्रेयसीने प्रियकरावर केला हल्ला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 03:39 PM2023-03-16T15:39:21+5:302023-03-16T15:46:53+5:30

झारखंडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

jamshedpur first drank alcohol then relationship after dispute angry girlfriend killed lover pujari arrested | अगोदर दारू पिले, संबंध ठेवले, वाद सुरू झाला, रागाच्याभरात प्रेयसीने प्रियकरावर केला हल्ला अन्...

अगोदर दारू पिले, संबंध ठेवले, वाद सुरू झाला, रागाच्याभरात प्रेयसीने प्रियकरावर केला हल्ला अन्...

googlenewsNext

झारखंडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जमशेदपूर येथील परसुडी येथे एका प्रेमिकेने प्रियकराची हत्या केल्याचे समोर आले आहे. जमशेदपूर येथील परसुडीह येथे एक दाम्पत्य एकत्र राहत होते. या दोघांच्यात नेहमी वाद-विवाद होत होते. एक दिवस असाच वाद झाला. या वादातून त्या महिलेने आपल्या प्रियकराची हत्या केल्याचे समोर आले आहे. 

पोलिसांनी बुधवारी याबाबत खुलासा केला आहे. खून केल्यानंतर महिलेने सुबोधचा मृतदेह खोलीत बंद करून घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्या महिलेने खुनाची कबुली दिली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुबोध याची २ मार्च रोजी हत्या झाली होती. ६ मार्च रोजी मृतदेह बाहेर काढण्यात आला. चौकशीसाठी प्रेयसी शारदा हिला अटक करण्यात आली. शारदा यांना तीन मुले आहेत. आणि सुबोधलाही दोन मुले आणि दोन मुली आहेत. दोघेही गेल्या एक वर्षापासून अवैध संबंधात होते. दरम्यान, दोघेही बारीगोडा येथील सुबोध सिन्हा यांच्या भाड्याच्या घरात राहत होते. दोघांनी स्वतःला पती-पत्नी आहे असं सांगत होते. २ मार्च रोजी दारू पिऊन दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले, त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला. दरम्यान, दोघांत जोरदार हाणामारीही झाली.

दरम्यान, त्या रात्री या दोघांनी मिळून दारु पिली. यानंतर दोघांनी संबंध ठेवले. यानंतर दोघात पुन्हा भांडण सुरू झाले. यावेळी भांडणातून सुबोधने शारदाला गळफास घेऊन आत्महत्या करण्याची धमकी दिली आणि स्कार्फच्या साहाय्याने गळफास लावून घेतला. यावेळी झटापटीत फास आवळला. यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. सुबोधचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच शारदाने तिथून फरार झाली.

मला अन् माझ्या कुटुंबीयांना आहेर यांच्यापासून धोका, आता काँग्रेस अध्यक्षांचा आरोप

आरोपी महिलेने गुन्हा कबुल केला आहे. एका वर्षात सुबोधने माझी जमीन आणि दागिने विकले होते. यावरून वारंवार भांडणे होत होती. जेव्हा त्याच्याकडे पैसे मागायचे तेव्हा तो भांडत होता. सुबोधने महिलेचा व्हिडिओही बनवण्यात आला होता. जो व्हायरल करण्याची धमकी देत होता, असा आरोपही महिलेने केला आहे. 

Web Title: jamshedpur first drank alcohol then relationship after dispute angry girlfriend killed lover pujari arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.