प्रेयसीचं कापलेलं शिर बॅगमध्ये ठेवून फिरत होता प्रियकर, ४ वर्षाआधी पळून आली होती तरूणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 12:12 PM2021-07-08T12:12:00+5:302021-07-08T12:12:22+5:30
जमशेदपूर जवळील सरायकेलामध्ये एका प्रियकराने आपल्या प्रेयसीचं शिर कापून ते बॅगमध्ये ठेवून फिरत होता.
दररोज हत्येच्या विचित्र घटना समोर येत असतात. कधी कधी तर या घटना अशा असतात की, त्ंयांवर विश्वास बसत नाही तर काही अशा असतात की, माणूस हा इतका क्रूर कसा होऊ शकतो असा प्रश्न पडतो. झारखंडच्या जमशेदपूरमधून अशीच एक खळबळजनक घटना समोर आली आहे.
जमशेदपूर जवळील सरायकेलामध्ये एका प्रियकराने आपल्या प्रेयसीचं शिर कापून ते बॅगमध्ये ठेवून फिरत होता. त्यानंतर गावातील लोकांची जशी आरोपीवर पडली तो बॅग सोडून तेथून फरार झाला. गावातील लोकांनी घटनेची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी कारवाई करत आरोपीला अटक केली. (हे पण वाचा : धक्कादायक! पतीचा अपघात झाल्याचं खोटं सांगत महिलेला घेऊन गेला अन् तिघांनी केला गॅंगरेप)
मीडिया रिपोर्टनुसार, मृत महिलेचं नाव सविता कुम्हारिन असं होतं. ही महिला चार वर्षाआधी घरातून पळून जाऊन आरोपी तरूण गिडू गोपसोबत राहत होती. तेच आरोपीच्या चौकशीनंतर महिलेचं धडही ताब्यात घेतलं आहे. आरोपीची चौकशी केल्यावर याप्रकरणी अनेक खुलासे झाले. मात्र, त्याने हत्या का केली याचं कारण अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
पोलीस घटनेचा तपास करत आहेत. असं सांगितलं जात आहे की, आरोपी तरूण मानसिक आजारी आहे. दरम्यान सरायकेलामधील ही अशी पहिलीच घटना नाही. याआधीही मानसिक रूपाने आजारी एका व्यक्तीने महिला शिक्षिकेच्या घरात घुसून तिचं शिर कापलं होतं. त्यानंतर तो खुलेआम महिलेचं शिर घेऊन फिरताना दिसला होता.