पाकिस्तानमध्ये डी कंपनीशी जानचे २० वर्षापूर्वीचे संबंध; पायधुनी पोलीस ठाण्यात गोळीबाराची केस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 03:19 PM2021-09-15T15:19:33+5:302021-09-15T15:45:05+5:30
ATS on Jan Mohammad Shaikh : शेख हा एकटाच दिल्लीला निघाला होता. ९ सप्टेंबरला तो तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करत होता.
दिल्ली आणि मुंबईसह आणखी काही भागांत स्फोट व दहशतवादी कारवाया करण्याचा पाकिस्तान समर्थक दहशतवाद्यांचा कट दिल्ली पोलिसांनी उधळून लावला. दिल्ली पोलिसांनी काल ६ दहशतवाद्यांना अटक केली. अटक केलेल्या संशयित दहशतवाद्यांपैकी एकमुंबईच्या सायन परिसरातील धारावीचा रहिवासी आहे. जान मोहम्मद अली मोहम्मद शेख असं या धारावीतील संशयित दहशतवाद्याचं नाव आहे. शेख हा एकटाच दिल्लीला निघाला होता. ९ सप्टेंबरला तो तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करत होता. पाकिस्तानमध्ये डी कंपनीसोबत संबंध २० वर्षांपूर्वी असून सध्या त्याची आर्थिक परिस्थिती ठीक नव्हती, अशी खळबळजनक माहिती राज्याचे एटीएसचे प्रमुख विनीत अगरवाल यांनी दिली.
शेख एकटाच मुंबई सेंट्रल ते निजामुद्दीनदरम्यान प्रवासाचं तात्काळ तिकीट घेऊन १३ सप्टेंबरला निघाला. ९ तारखेला तो दिल्लीला जाणार होता. मात्र, तिकीट मिळालं नाही, नंतर १० तारखेला पैसेही पाठवले होते. नंतर १३ तारखेला जाण्याचं तात्काळ तिकीट वेटिंग काढलं आणि जान गोल्डन एक्स्प्रेस ट्रेनच्या एस ६ डब्ब्यातून निजामुद्दिनसाठी १३ सप्टेंबरला रवाना झाला. प्रवासादरम्यान शेखला दिल्ली पोलिसांनी कोटा येथे रोखले आणि अटक केली. त्यावेळी त्याच्याकडे कोणतेही शस्त्र सापडले नाही. मात्र, का अटक केली हे दिल्ली पोलीस सांगू शकतील. आमची टीम आज सायंकाळी दिल्लीला जाणार असून ते या सर्व बाबींची चौकशी करतील. आम्ही देखील आमच्याकडील सर्व माहिती दिल्ली पोलिसांना देऊ. मात्र, या दहशतवादी कृत्याबाबत पूर्व कल्पना केंद्रीय यंत्रणांना होती. त्यांनी ती दिल्ली पोलिसांना दिली. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पुढे विनीत अगरवाल यांनी दिली.
धारावीत खळबळ, एक चरसी बनला दहशतवादी, सुरक्षेसाठी जानचे कुटुंब पोलिसांच्या देखरेखीखालीhttps://t.co/WOYG5neYmS
— Lokmat (@MiLOKMAT) September 15, 2021
जानचा नेमका क़ाय कट होता, याबाबतच्या चौकशीसाठी एटीएस पथक दिल्लीला जाणार असल्याचे एटीएस प्रमुख विनीत अग्रवाल यांनी सांगितले. तसेच पुढे ते म्हणाले, जानला कर्ज होतं. पैशाची गरज होती. कर्ज काढून टॅक्सी घेतली होती. त्यानंतर एक बाईक देखील घेतली होती. याचे कर्ज जान परतफेड करून शकला नाही. पैशांसाठीच तो यात सहभागी झाल्याची शक्यता असून अधिक तपास सुरु असल्याचे एटीएस प्रमुखांनी सांगितले. तसेच रेकीचं वृत्त चुकीचं असून शेखविरोधात पायधुनी पोलीस ठाण्यात गोळीबार आणि मारहाण प्रकरणी गुन्हे नोंद आहेत.
धारावीतील संशयित दहशतवाद्यांच्या पत्नीच्या मनात चुकचुकलेली संशयाची पाल https://t.co/MWmS2WfPXN
— Lokmat (@MiLOKMAT) September 15, 2021