३ वर्षांपासून वाँटेड असलेल्या दहशतवाद्याच्या मुसक्या एटीएसने आवळल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 03:15 PM2019-09-22T15:15:30+5:302019-09-22T15:19:57+5:30
मुजाहिरी हा भारतीय उपखंडातील तरुणांना जिहादसाठी तयार तसेच प्रेरित करत होता.
झारखंड - आतंकवादी मोहम्मद कलिमुद्दीन मुजाहिरी याला एटीएसने जमशेदपूर येथून अटक केली आहे. काल ही कारवाई करण्यात आली असून अल कायदा या दहशतवादी संघटनेचा हा मोस्ट वाँटेड दहशतवादी आहे. टाटा नगर रेल्वे स्टेशन येथून या दहशतवाद्याला अटक करण्यात आली. मुजाहिरी हा भारतीय उपखंडातील तरुणांना जिहादसाठी तयार तसेच प्रेरित करत होता.
पोलीस महासंचालक एम. एल. मीना यांनी दिलेल्या माहितीनुसार कलिमुद्दीन हा जमशेदपूरचा रहिवासी असून तो गेल्या तीन वर्षांपासून लपून बसला होता, जमशेदपूर येथे त्याच्याविरोधात भा. दं. वि.च्या वेगवेगळ्या कलमांनुसार अनेक गुन्हे दाखल आहेत. कलिमुद्दीनचे साथीदार मोहम्मद अब्दुल रहमान अली उर्फ हैदर उर्फ कटकी, अब्दुल सामी उर्फ उज्जैर उर्फ उर्फ हसन हे दिल्लीच्या तिहार तुरुंगात अटकेत आहेत. तरुणांना दहशतवादी संघटनेत सामिल करून घेण्यासाठी कलिमुद्दीन उत्तर प्रदेश, गुजरात, पश्चिम बंगाल आणि अन्य राज्यात फिरत असे. त्याचप्रमाणे तो बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, सौदी अरब आणि इतर देशांत देखील गेला असल्याची माहित मीना यांनी दिली.
Jharkhand: Terrorist Kalimuddin Mujahiri arrested from Jamshedpur. ADG ML Meena says,“He was wanted for his involvement in terrorist activities&was absconding since 3 yrs. Anti-Terrorism Squad arrested him yesterday. He was living in a madrasa & used to prepare youth for Jihad" pic.twitter.com/IUglcYUJYx
— ANI (@ANI) September 22, 2019