बंदुक घेऊन अचानक बारमध्ये शिरली आणि पतीसोबत बसलेल्या तरूणीवर केला गोळीबार....
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 09:41 AM2021-02-24T09:41:25+5:302021-02-24T09:41:34+5:30
Crime News : ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. व्हिडीओत दिसून येतं की, डायने रफेला डी सिल्वा एका बारमध्ये शिरते आणि गोळीबार सुरू करते.
एका महिलेने बारमध्ये पतीसोबत बसलेल्या एका तरूणीवर गोळी झाडून तिची हत्या केली. यात तरूणी जागेवरच ठार झाली. यावेळी महिलेचा पती त्याच्या पाच मित्रांसोबत बारमध्ये बसला होता. या घटनेने एकच खळबळ उडाली. पतीसोबत बसलेल्या तरूणीवर गोळी झाडण्याची ही घटना ब्राझीलच्या(Brazil) तिआंगुआमधील आहे. गुरूवारी घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. व्हिडीओत दिसून येतं की, डायने रफेला डी सिल्वा एका बारमध्ये शिरते आणि गोळीबार सुरू करते.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, ३१ वर्षीय सिल्वाने २६ वर्षीय डजेने बतिस्ता बॅरोला डोक्यावर गोळी झाडली. सिल्वा एका दुसऱ्या व्यक्तीसोबत बाइकवर बसून बारमध्ये आली होती. बारमध्ये शिरताना महिलेने हातात एक हॅंडबॅग घेतली होती. घटनेदरम्यान बारमधील एका २४ वर्षीय तरूणालाही गोळी लागली. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. (हे पण वाचा : मै हू ना! शिक्षकाने विद्यार्थिनीला शाळेत शिकवले; वयात येताच पळून जात लग्न केले)
घटनेनंतर पती सिल्वासोबत भिडला आणि तिच्या हातून पिस्तुल घेण्याचा प्रयत्न करू लागला. काही वेळाने सिल्वा बारमधून जाते. मात्र, नंतर पोलिसांनी तिला अटक केली. पोलिसांना संशय आहे की, सिल्वा आपल्या पतीसोबत दुसऱ्या महिलेला पाहून संतापली होती. घटना ज्या बारमध्ये झाली तो बार सेक्स वर्कर्ससाठी ओळखला जातो. पोलिसांनी सांगितले की, याआधीही पती-पत्नीत अशा बारमध्ये जाण्यावरून भांडण झालं होतं. (हे पण वाचा : बोंबला! जबरदस्ती किस करत महिलेने दाताने तोडली त्याची जीभ, ती पक्षी घेऊन गेला अन् खाऊन टाकली....)
नंतर सिल्वाने पोलिसांना सांगितले की, तिने पतीच्या आसपास असलेली गर्दी दूर करण्यासाठी निशाणा न लावता गोळी झाडली होती. तिला मृत मुलीबाबत माहिती नव्हती. पोलिसांना अशीही माहिती मिळाली आहे की, सिल्वाने घटनेच्या ५ तासांआधीच पिस्तुल खरेदी केलं होतं.