Jhansi Crime News: माता न तू वैरिणी! 2 महिन्यांची चिमुकली रात्रभर रडायची, संतापलेल्या आईनं नाल्यात बुडवून मारलं...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 02:51 PM2023-01-18T14:51:47+5:302023-01-18T14:52:54+5:30

Jhansi Crime News: मुलीच्या रडण्याने संतापलेल्या आईनं दोन महिन्यांच्या मुलीला नाल्यात फेकून दिलं.

Jhansi Crime News: 2-month-old baby used to cry all night, angry mother drowned her in the drain | Jhansi Crime News: माता न तू वैरिणी! 2 महिन्यांची चिमुकली रात्रभर रडायची, संतापलेल्या आईनं नाल्यात बुडवून मारलं...

Jhansi Crime News: माता न तू वैरिणी! 2 महिन्यांची चिमुकली रात्रभर रडायची, संतापलेल्या आईनं नाल्यात बुडवून मारलं...

googlenewsNext

Jhansi Crime News:उत्तर प्रदेशच्या झाशीमध्ये एका क्रूर आईनं आपल्या 2 महिन्यांच्या मुलीला नाल्यात बुडवून मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चिमुकलीच्या हत्येनंतर आरोपी आईनं पोलिसांची दिशाभूलही केली. मात्र, नंतर तिनं आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांच्या चौकशीत तिनं सांगितलं की, मुलगी जन्मापासूनच रात्रभर रडायची, यामुळे तिला(आईला) झोप येत नव्हती. यामुळे संतापात येऊन मुलीला नाल्यात फेकलं.

चिमुकली रडत होती म्हणून आईनं तिला ठार केल्याचं ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. पोलिसांनी सांगितल्यानुसार, गेल्या 2 महिन्यांपासून आरोपी आई अस्वस्थ होती, यानंतर घरात कोणी नसताना पाहून तिनं आपल्या मुलीला नाल्यातील थंडगार पाण्यात जिवंत फेकलं, यात तिचा जागीच मृत्यू झाला. 26 तासात निष्पापाच्या हत्येचा खुलासा करत पोलिसांनी महिलेला तुरुंगात पाठवलं.

आधी पोलिसांची दिशाभूल केली
एसएसपी राजेश एस यांनी सांगितलं की, पोलिसांना 112 क्रमांकावर एक मुलगी घरातून बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. तब्बल 26 तासांनंतर मुलीचा मृतदेह घराशेजारील नाल्यातून बाहेर काढण्यात आला. कुटुंबीयांची चौकशी केली असता आईनं त्यांची दिशाभूल केली. मात्र पोलिसांना संशय आल्यानं महिलेची कडक चौकशी केली, यानंतर तिनं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

Web Title: Jhansi Crime News: 2-month-old baby used to cry all night, angry mother drowned her in the drain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.