भयंकर! PUBG एडिक्ट मुलाने आई-वडिलांची केली हत्या; पोलिसांना हसत म्हणाला, "मीच मारलं"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2023 12:50 PM2023-08-06T12:50:02+5:302023-08-06T12:57:16+5:30

भावाची मानसिक स्थिती चांगली नव्हती. वडील त्याला पबजी खेळायला द्यायचे नाहीत. यावरून अनेकदा भांडण व्हायचं.

jhansi pubg addict killed parents youth beat his father to death with stick | भयंकर! PUBG एडिक्ट मुलाने आई-वडिलांची केली हत्या; पोलिसांना हसत म्हणाला, "मीच मारलं"

भयंकर! PUBG एडिक्ट मुलाने आई-वडिलांची केली हत्या; पोलिसांना हसत म्हणाला, "मीच मारलं"

googlenewsNext

झाशीमध्ये PUBG व्यसन असलेल्या 26 वर्षीय मुलाने त्याच्या आई-वडिलांची तवा मारून हत्या केली. त्यानंतर कपडे बदलले आणि खोलीत जाऊन आरामात बसला. हत्येची माहिती मिळताच पोलीस पोहोचले असता आरोपी मुलगा बेडवर बसलेला दिसला. पोलिसांना पाहून हसू लागला. इन्स्पेक्टरने विचारले असता तो प्रथम काही बोलला नाही. मग म्हणाला- होय, मीच मारलं आहे. अंकित असं आरोपीचं नाव आहे. बहीण नीलमने सांगितले की, भावाला PUBG चं व्यसन होतं. 

भावाची मानसिक स्थिती चांगली नव्हती. वडील त्याला पबजी खेळायला द्यायचे नाहीत. यावरून अनेकदा भांडण व्हायचं. या वादातून त्याने ही हत्या केल्याचा संशय आहे. ही घटना नवाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिचोरे येथे घडली. लक्ष्मी प्रसाद (५८) हे पत्नी विमला (५५) यांच्यासोबत येथे राहत होते. पालरा येथील सरकारी शाळेत ते मुख्याध्यापक होते. मुलगा अंकित (26) त्याच्यासोबत राहत होता. 

तीन मुलींपैकी मुलगी नीलम आणि सुंदरी यांचे आधीच लग्न झाले होते. नीलमचे सासरचे घर शेजारच्या कॉलनीत आहे. लहान मुलगी शिवानी उराई येथे शिकत आहे. अंकित घरी मोबाईल रिपेअरिंगचे काम करायचा. बहीण नीलमने सांगितले की तो मोबाईलवर खूप गेम खेळत होता. सहा महिने त्याने खोली सोडली नाही. वागण्यातही बदल झाला होता. तो आई-वडिलांशी भांडणही करायचा. सगळ्यांना त्याची काळजी वाटत होती.

बहीण नीलमने सांगितले की, शनिवारी सकाळी तिने वडील लक्ष्मी प्रसाद यांना फोन केला, पण त्यांचा फोन उचलला गेला नाही. यानंतर शेजारी राहणाऱ्या काशीरामला बोलावण्यात आले. घरी जाऊन बघायला सांगितलं. घरी पोहोचल्यावर मला मेन गेट उघडे दिसले. त्याने दरवाजा उघडताच जमिनीवर रक्त पडले होते. बाबांचा श्वास थांबला होता. तर आई विमला रडत होती. तिला मेडिकल कॉलेजमध्ये नेले. तेथे उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. 

इन्स्पेक्टर सुधाकर मिश्रा यांनी सांगितले की, अंकितला हत्येचा कोणताही पश्चाताप नाही. त्याची मानसिक स्थिती ठीक नव्हती. खून केल्यानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही. जखमी अवस्थेत आई जमिनीवर होती. रात्री 12 ते 2 वाजण्याच्या दरम्यान त्याने ही हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.

नीलमने सांगितले की, कोरोनाच्या वेळी अंकितची नोकरी गेली होती. तो रेल्वे रुग्णालयात कंपाउंडर होते. लॉकडाऊनच्या काळात तो घरीच होता. याच दरम्यान तो अनेक तास मोबाईल आणि लॅपटॉपवर गेम खेळत असे. यापूर्वीही त्याने आई-वडिलांना मारहाण केली होती. ते त्याला गेम खेळण्यास मनाई करायचे आणि पुन्हा नोकरी करायला सांगायचे. या वादातून त्याने दोघांची हत्या केल्याचे समजतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: jhansi pubg addict killed parents youth beat his father to death with stick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.