Jharkhand Crime News: रांचीनंतर गुमलामध्ये पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न; पशू तस्कर फरार, 41 गाईंची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 01:34 PM2022-07-21T13:34:16+5:302022-07-21T13:35:44+5:30

Jharkhand Crime News: रांचीमध्ये महिला एसआयला चिरडून ठार केल्याची घटना शांत होत नव्हती तोच आता गुमला येथेही तशाच प्रकारची घटना घडली आहे.

Jharkhand Crime News: Cattle smuggler Attempt to crush police in Gumla; 41 cows rescued | Jharkhand Crime News: रांचीनंतर गुमलामध्ये पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न; पशू तस्कर फरार, 41 गाईंची सुटका

Jharkhand Crime News: रांचीनंतर गुमलामध्ये पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न; पशू तस्कर फरार, 41 गाईंची सुटका

googlenewsNext

गुमला: रांचीमध्ये महिला एसआयला चिरडून ठार केल्याची घटना शांत होत नव्हती तोच आता गुमला येथेही तशाच प्रकारची घटना घडली आहे. गुरे तस्करांनी रायडीहमध्ये पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न केला. यानंतर आरोपींनी पोलिस ठाण्याजवळील अडथळा तोडून पळ काढला. यामध्ये एएसआय प्रसिद्ध तिवारी यांच्या पायाला दुखापत झाली आहे. पोलिसांच्या पथकाने पाठलाग करून प्राणी तस्करांची दोन वाहने पकडली, पण तस्कर पळून जाण्यात यशस्वी झाले.

संबंधित बातमी- 'वर्दी'ला चिरडले! गेल्या 24 तासात ड्यूटीवर असलेल्या तीन पोलिस अधिकाऱ्यांची चिरडून हत्या

पोलिसांना वाहनातून 41 गोवंश जनावरे सापडली आहेत. या प्रकरणाची माहिती देताना रायडीह पोलिस स्टेशनचे प्रभारी अमित कुमार म्हणाले की, गुमला एसपी एहतेशाम वकारीब यांना छत्तीसगड मार्गे वाहनांमधून प्राण्यांची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून पहाटे तीन वाजता पोलिसांचे पथक शंख मोड मांढटोली येथे तस्करांच्या वाहनांची वाट पाहू लागले. इकडे टेक्निकल सेल चालकाचा मोबाईल नंबरही ट्रेस करत होता. दरम्यान मालवाहू ट्रक व बोलेरो येताना दिसल्या. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला मात्र चालकाने वेग वाढवून पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न केला.

ट्रक उभी करून चालक फरार 
सुदैवाने ते तात्काळ घटनास्थळावरुन बाजुला झाल्याने मोठी दुर्घटना टळली. यानंतर पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या गेटजवळ गतिरोधक लावले आणि इतर पोलिसांना माहिती दिली. यानंतर आरोपींचा पाठलाग सुरू झाला. पोलीस ठाण्याच्या तीनशे मीटर अगोदरच खीराखंड वळणावर बोलेरो ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात कोसळली. त्यानंतर चालक पळून गेला. पोलिस ठाण्याच्या गेटजवळ पुन्हा ट्रक थांबविण्याचा प्रयत्न केला असता, तो अडथळा तोडून पुढे गेला. मात्र पोलिसांचा पाठपुरावा सुरूच होता. यावर चालकाने ट्रक सिलम बायपासजवळ उभा करून पळ काढला.

वाहनातून 41 गोवंश जनावरे जप्त 
पोलिसांनी दोन्ही वाहने ताब्यात घेतली आहेत. यामध्ये 41 गोवंश जनावरे जप्त करण्यात आली असून ती सर्व गावकऱ्यांमध्ये वाटण्यात आली. तर जखमी जनावरांवर उपचार करण्यात आले आहेत. याप्रकरणी रायडीह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, लवकरच तस्करांना अटक करण्यात येईल.

Web Title: Jharkhand Crime News: Cattle smuggler Attempt to crush police in Gumla; 41 cows rescued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.