Crime News:डायन असल्याचा संशय; नातवानेच केला आजीचा निर्घृण खून, शरीरावर चाकूचे अनेक वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 13:38 IST2022-07-27T13:38:00+5:302022-07-27T13:38:08+5:30
Jharkhand Crime: या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Crime News:डायन असल्याचा संशय; नातवानेच केला आजीचा निर्घृण खून, शरीरावर चाकूचे अनेक वार
Jharkhand Crime:झारखंडच्या सरायकेला पोलीस स्टेशन हद्दीतील महादेवपूर गावात डायन असल्याच्या संशयावरून एका वृद्ध महिलेची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. महिलेचा खून करणारा दुसरा-तिसरा कोणी नसून, तिचा नातू आहे. नातवानेच 85 वर्षीय आजीवर यांची धारदार शस्त्राने वर केले.
डायन असल्याचा संशय
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीच्या आईची तब्येत बिघडली होती, त्याला आईच्या दुखण्यामागे आजी इला कुंभकर यांचा हात असल्याचा संशय आला. आजी डायन आहे, तिनेच आईवर जादूटोणा केल्याच्या संशयातून त्याने आजीची निर्घृण हत्या केली. या प्रकरणाबाबत पोलीस अधिकारी गौतम कुमार म्हणाले की, एफआयआर नोंदवून हत्येतील आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. आरोपी बुधेश्वर कुंभकरला सध्या पोलिसांनी अटक केली आहे.
आजीशी भांडण झाले
बुद्धेश्वर कुंभकरची आई अनेकदा आजारी असायची. नातवाने आजीलाच आजारपणाचे कारण मानले आणि तिच्यावर डायन असल्याचा संशय व्यक्त केला. बुधेश्वरची आई ताबूक कुंभकर या सासू इलासोबत गावात राहत होत्या. आरोपी आजारी आईला भेटायला गेला होता, त्यादरम्यान रात्री काही कारणावरून आजीसोबत वाद सुरू झाला. या वादात बुद्धेश्वरने आजीवर चाकूने हल्ला केला, त्यात तिचा जागीच मृत्यू झाला.