प्रेमाचे वैरी! मारहाण होत असलेल्या बॉयफ्रेन्डला वाचवायला गेलेल्या गर्लफ्रेन्डचा मृत्यू, दोन्ही भावांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 01:06 PM2021-06-05T13:06:07+5:302021-06-05T13:06:21+5:30
तरूणी आणि तरूण भेटण्यासाठी गावातील एका तलावाजवळ गेले होते. तिथे तरूणीच्या कुटुंबीयांनी दोघांना एकत्र पाहिलं आणि तिथेच तरूणाला मारहाण सुरू करण्यात आली.
स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतर आजही समाजात प्रेमाला सगळेच मान्य करत नाही. आजही खोट्या सन्मानासाठी प्रेम करणाऱ्या तरूण-तरूणींची हत्या केली जाते. अशीच एक घटना झारखंडच्या मडवा गावातून समोर आली आहे. इथे एका तरूणीच्या कुटुंबीयांनी तरूणीला आणि तिच्या प्रियकराला इतकी मारहाण केली की, यात तरूणीचा जीव गेला. तर तरूणाची हालत गंभीर आहे.
तरूणी आणि तरूण भेटण्यासाठी गावातील एका तलावाजवळ गेले होते. तिथे तरूणीच्या कुटुंबीयांनी दोघांना एकत्र पाहिलं आणि तिथेच तरूणाला मारहाण सुरू करण्यात आली. तरूणीच्या मृत्यूनंतर पोलिसांनी तरूणीच्या दोन भावांना हत्येच्या गुन्ह्यात अटक केली आहे. (हे पण वाचा : अरे देवा! प्रेयसीचा जीव वाचवण्यासाठी प्रियकराने केली आत्महत्या, मनाला चटका लावणारी लव्हस्टोरी)
चतरा जिल्ह्यातील एका कुटुंबाला आपल्या मुलीने प्रेम करणं इतकं खटकलं की, त्यांनी दोघांना बेदम मारहाण केली. तरूणाची स्थिती गंभीर आहे. तर तरूणीने यात जीव गमावला. दोघेही भेटण्यासाठी गावातील एका तलावाजवळ गेले होते. तिथे दोघांना तरूणीच्या कुटुंबीयांना आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं. ज्यानंतर तरूणीच्या भावांनी तरूणाला बेदम मारहाण सुरू केली. आपल्या प्रियकराला मारहाण होत असल्याचं पाहून तरूणी त्याला वाचवण्यासाठी गेली होती. अशात तिच्या डोक्यावर काठीचा जोरदार वार झाला. त्यामुळे तिचा जागेवर मृत्यू झाला.
तरूणीचा प्रियकर अंकित कुमार गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी विवेक कुमार यादव घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी हत्येच्या आरोपात तरूणीचे भाऊ सुरज गंझु आणि जीवन गंझु यांना अटक केली.