भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 11:09 AM2024-11-28T11:09:48+5:302024-11-28T11:10:20+5:30

दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडसारखेच एक भयंकर प्रकरण झारखंडमधून समोर आलं आहे.

jharkhand live in partner murdered by boyfriend body into 50 pieces khunti crime | भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले

फोटो - आजतक

दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडसारखेच एक भयंकर प्रकरण झारखंडमधून समोर आलं आहे. एका तरुणाने आधी आपल्या लिव्ह इन गर्लफ्रेंडची गळा दाबून हत्या केली आणि नंतर मृतदेहाचे ४०-५० तुकडे केले आणि प्राण्यांना खाण्यासाठी जंगलात फेकून दिले आहेत. आरोपी बॉयफ्रेंड नरेश भेंगरा याला आता अटक करण्यात आली आहे.

ही घटना हत्येच्या १५ दिवसांनंतर २४ नोव्हेंबर रोजी उजेडात आली, जेव्हा एक भटका कुत्रा शरीराचे काही भाग घेऊन जरियागड पोलीस स्टेशनच्या जोरदाग गावाजवळ दिसला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपी बॉयफ्रेंडला पकडलं. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने गर्लफ्रेंडची हत्या का केली हे सांगितलं.

नरेश भेंगरा गेल्या काही वर्षांपासून तामिळनाडूतील खुंटी जिल्ह्यातील २४ वर्षीय तरुणीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. काही काळापूर्वी आरोपी झारखंडला परतला आणि आपल्या गर्लफ्रेंडला काहीही न सांगता त्याने दुसऱ्या महिलेशी लग्न केलं. त्यानंतर पत्नीला झारखंडमध्ये सोडून तो तामिळनाडूत परत आला आणि गर्लफ्रेंडसोबत राहू लागला.

खुंटीचे एसपी अमन कुमार यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितलं की, "ही क्रूर घटना ८ नोव्हेंबर रोजी घडली. आरोपीने दुसरं लग्न केलं होतं, त्यामुळे त्याला त्याच्या गर्लफ्रेंडला घरी घेऊन जायचं नव्हतं. त्याऐवजी तो तिला जवळच्या जंगलात घेऊन गेला. गळा आवळून तिची हत्या केली आणि मृतदेहाचे तुकडे केले. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा तपास करणारे इन्स्पेक्टर अशोक सिंह यांनी सांगितले की, हा व्यक्ती तामिळनाडूतील एका कसाईच्या दुकानात काम करत होता. त्याने कबूल केलं की त्याने महिलेच्या शरीराचे ४० ते ५० तुकडे केले आणि नंतर ते वन्य प्राण्यांना खाण्यासाठी जंगलात फेकले. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 
 

Web Title: jharkhand live in partner murdered by boyfriend body into 50 pieces khunti crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.