जंगलात आढळला शिर नसलेला अल्पवयीन मुलीचा मृतदेह, बलात्कार करून हत्या केल्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 00:34 IST2020-08-30T00:34:03+5:302020-08-30T00:34:47+5:30
बलात्कारानंतर हा खून झाल्याचा संशय असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

जंगलात आढळला शिर नसलेला अल्पवयीन मुलीचा मृतदेह, बलात्कार करून हत्या केल्याची शक्यता
झारखंडमधील जंगलातील नाल्यातू १५ वर्षाच्या मुलीचा शिरच्छेद करून टाकलेला मृतदेह सापडला. बलात्कारानंतर हा खून झाल्याचा संशय असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
सरायकेला-खरसावन जिल्ह्यातील दलभंगा पोलिस चौकी (ओपी) अंतर्गत खारसवण-कुचाई रोडवरील माणिकिर जंगलातील कांकी नाला येथून शुक्रवारी स्थानिक ग्रामस्थांना हा मृतदेह आढळला, अशी माहिती पोलिसांनी शनिवारी दिली.
“आम्हाला शंका आहे की, मुलीची हत्या करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार करण्यात आला असावा आणि तिची ओळख लपवण्यासाठी नंतर त्याने शिरच्छेद केला. आम्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सरायकेला येथील रुग्णालयात पाठवला आहे आणि अहवाल मिळाल्यानंतरच काही निश्चितपणे सांगता येईल, ”असे दलभंगा ओपी प्रभारी ओमप्रकाश रजक यांनी शनिवारी सांगितले.
रजक पुढे म्हणाले की, आजही पीडितेच्या डोक्यासाठी ते संपूर्ण जंगल शोधत होते, परंतु अद्यापपर्यंत त्याचा शोध लागला नाही, त्यामुळे तिची ओळख प्रस्थापित करणे कठीण झाले.“आम्ही स्थानिक ग्रामस्थांची चौकशी केली. पण त्यांना मृतदेहाची ओळख पटली नाही. रजक म्हणाले की, पीडित मुलीची ओळख पटल्यानंतरच आम्ही तिचा पत्ता आणि कुटूंबातील सदस्यांचा शोध घेऊ शकू आणि या भीषण हत्येमागील हेतू शोधू शकू. मिळालेल्या माहितीनुसार, म्यानकीरच्या जंगलात झाडे तोडण्यासाठी गेले असता, तेथील ग्रामस्थांना अल्पवयीन मुलीचे शिरच्छेद केलेले धड आढळले.
अन्य महत्वाच्या बातम्या...