प्रेमात अडसर येत असल्याने एकाची निर्घृण हत्या; पाचजणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 08:50 PM2020-01-24T20:50:59+5:302020-01-24T20:52:54+5:30

हत्या केल्यानंतर मृतदेह रेल्वे रुळावर दिला फेकून 

Jharkhand nattive brytally murderd at Goa, all five accused nabbed by goa poilice | प्रेमात अडसर येत असल्याने एकाची निर्घृण हत्या; पाचजणांना अटक

प्रेमात अडसर येत असल्याने एकाची निर्घृण हत्या; पाचजणांना अटक

Next
ठळक मुद्देविक्रम उर्फ ताबडे खाडिया (२0) , सतीश खाडिया (१९), विपिन खाडिया ( १९) , संजय खाडीया (२0) व विनोद कुल्लू (२0) अशी संशयितांची नावे आहेत. खून प्रकरणाचा तपास लावल्याबद्दल या पोलीस पथकांचे गोव्याचे पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनी सन्मान केला आहे.

मडगाव - प्रेमात अडसरा येत असल्याने मूळ झारखंड येथील एका तीसवर्षीय इसमाचा निर्घृण्ण खून करुन त्याचा मृतदेह गोव्यातील धारगळ येथील रेल्वे रुळावर टाकून देणाऱ्या पाचजणांना कोकण रेल्वे पोलिसांनी जेरबंद केले. जैयलेश्वर खाडिया असे मयताचे नाव असून, सर्व संशयितही झारखंड राज्यातील आहेत. विक्रम उर्फ ताबडे खाडिया (२0) , सतीश खाडिया (१९), विपिन खाडिया ( १९) , संजय खाडीया (२0) व विनोद कुल्लू (२0) अशी संशयितांची नावे आहेत. ते मूळ झारखंड राज्यातील गुमला जिल्हयातील रहिवाशी आहे. 

२१ जानेवारी रोजी गोव्यातील धारगळ येथेच खुनाची ही घटना घडली होती. संशयितांवर भारतीय दंड संहितेच्या ३०२, २०१, ३४१ कलमांखाली कोकण रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपासासाठी त्यांना पेडणे येथील प्रथमवर्ग न्यायालयात उभे केले असता, त्यांना दहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती दक्षिण गोवा पोलीस अधिक्षक अरविंद गावस यांनी दिली. मृत जैयलेश्वर हा पेडणे तालुक्यातील धारगळ येथे एका इसमाकडे कामाला होता. हुर्राक गाळण्याचे तो काम करीत होता. 

सदया हुर्राक हंगामा जवळ आल्याने दोन महिन्यापुर्वीच तो गोव्यात आला होता. तो एका महिलेसमवेत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहात होता. या महिलेला एक पंधरा वर्षीय मुलगी असून, तिच्या पहिल्या पतीपासून तीला ही मुलगी झाली होती. ती मुलगी झारखंड येथे रहात असून, तेथेच तिचे विक्रम खाडिया याच्याकडे सूत जमले होते. दोघांमध्ये प्रेम होते. मात्र, जैयलेश्वर याचा या प्रेमाला विरोध होता. विक्रम हा याच आठवडयात गोव्यात आला होता. आपल्या अन्य मित्रांबरोबर त्याने जैयलेश्वर याला राजी करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो काहीही ऐकून घेत नव्हता, त्याचा या प्रेमप्रकरणाला कडाडून विरोध होता. मंगळवारी २१ रोजी रात्री संशयित व मयत जैयलेश्वर हे एका स्थानिक बारमध्ये दारु पिण्यासाठी बसले होते. त्यावेळी संशयितांनी जैयलेश्वर याची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो काहीही ऐकायला तयार नव्हता. उभयंतांमध्ये यावेळी कडाक्याचे भांडण झाले. नंतर संशयिंत जैयलेश्वर याला धारगळ रेल्वे रुळाजवळ घेउन गेले. तेथे त्याला मारहाण केल्यानंतर तिक्ष्ण हत्याराने त्याच्या डोक्यावर वार करण्यात आले. व नंतर त्याला रेल्वे रुळावर आणून संशयित घरी परतले. या रुळवरुन धावणाºया रेल्वेखाली तो येईल. हा मृत्यू रेल्वे धडकेने झाला असे पोलिसांना वाटेल व आपले कुर्कम कुणालाही कळणार नाही म्हणून संशयिताने हे नाटय रचले होते असेही पोलीस तपासात आढळून आले आहे. मात्र संशयितांचा डाव यशस्वी होउ शकला नाही. रात्रीच्या गस्तीवरील रेल्वे गॅगमनला एक अज्ञात इसम रेल्वे रुळावर पडलेला असल्याचे दिसून आल्यानंतर त्याने लागलीच रेल्वे स्टेशन मास्तरला त्याची कल्पना दिली. नंतर १0८ अ‍ॅम्बुलन्स सेवेच्या मदतीने जैयलेश्वरला म्हापसा येथील आझिलो इस्पितळात दाखल केले असता, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. शवचिकित्सा अहवालात हा मयताच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे निदान झाल्यानंतर हा खुनाचाच प्रकार असल्याची पोलिसांना पक्की खात्री झाली होती.

 

कोकण रेल्वे पोलीस ठाण्याचे उपअधिक्षक सेमी तावारीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शेरिफ जॅकीस, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरुण देसाई , पोलीस शिपाई निलेश सावंत, अमरदीप चौधरी, श्रीनिवास रेडडी, तेजस धुरी, प्रदीप गावकर, तानाजी राणे, विराज मलिक, प्रवीण राणे, समीर शेख या कोकण रेल्वे पोलीस ठाण्यावरी पोलिसांसह कुंकळळी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष नाईक यांचे एक पथक तयार करुन शोधकार्याला सुरुवात केली. नंतर सर्व संशयितांच्या मुसक्या आवळल्या. त्यांनी आपल्या गुन्हयाची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या खून प्रकरणाचा तपास लावल्याबद्दल या पोलीस पथकांचे गोव्याचे पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनी सन्मान केला आहे.

 

Web Title: Jharkhand nattive brytally murderd at Goa, all five accused nabbed by goa poilice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.