हृदयद्रावक! सॉरी बाबा, सासरी येऊन मी खूप मोठी चूक केली; Video शेअर करत विवाहितेची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 03:54 PM2021-05-21T15:54:50+5:302021-05-21T15:55:03+5:30

Woman Commits Suicide By Hanging In Dhanbad Video Viral : रेल्वे कर्मचाऱ्याच्या पत्नीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी विवाहितेने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता.

jharkhand woman commits suicide by hanging in dhanbad video viral harassing inlaws for dowry | हृदयद्रावक! सॉरी बाबा, सासरी येऊन मी खूप मोठी चूक केली; Video शेअर करत विवाहितेची आत्महत्या

हृदयद्रावक! सॉरी बाबा, सासरी येऊन मी खूप मोठी चूक केली; Video शेअर करत विवाहितेची आत्महत्या

Next

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना अनेक धक्कादायक घटना सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. झारखंडच्या धनबादमध्ये एका रेल्वे कर्मचाऱ्याच्या पत्नीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी विवाहितेने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. पती आणि सासरच्या मंडळींनी आपला हुंड्यासाठी खूप छळ केल्याचा आरोप तिने व्हिडीओमध्ये केला आहे. "सॉरी बाबा, सासरी येऊन मी खूप मोठी चूक केली" असं म्हणत मुलीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

झारखंडच्या धनबाद शहरातील धनसार भागात महावीर नगरमध्ये ही हृदयद्रावक घटना घडली. रेल्वे कर्मचारी आलोक प्रसाद याची 21 वर्षीय पत्नी कोमल पटेल हिने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी कोमलने एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. यात रडत-रडतच तिने आपण आत्महत्या करत असल्याचं सांगितलं. "बाबा, मी सुसाईड करत आहे. पुन्हा सासरी येऊन खूप मोठी चूक केली. सॉरी बाबा, मी तुमचं म्हणणं ऐकलं नाही. मला वाटलं माझा नवरा सुधारला असेल. पण त्याने पुन्हा मला मारहाण करण्यास सुरुवात केली. बाबा, माझ्या मुलाची काळजी घ्या, एवढंच तुम्हाला सांगायचं आहे" असं कोमलने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

कोमलचा मृतदेह हा शवविच्छेदन केल्यानंतर तिच्या माहेरी नेण्यात आलं. त्यावेळी माहेरच्या मंडळींवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कोमलचा पती आलोक आणि त्याच्या कुटुंबीयांना शिक्षा व्हावी, अशी मागणी कोमलची आई आणि बहीण ओरडून ओरडून करत होत्या. जस्टिस फॉर कोमल असं लिहिलेले फलक कोमलच्या नातेवाईकांनी हातात धरले होते. कोमलचे वडील उमेश प्रसाद यांनी तिचा पती आलोक प्रसाद, सासू, नणंद आणि नणंदेचा नवरा अशा सासरच्या मंडळींविरोधात पोलिसात तक्रार केली आहे. कोमलचा हुंड्यासाठी छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. 

सासरची माणसं कोमलकडे गाडी मागत होते, असंही ते म्हणाले. कोमलच्या आत्महत्येनंतर आलोक कुटुंबासह पसार झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आलोक कुमार हा ग्रुप डी रेल्वे कर्मचारी आहे. 2018 मध्ये कोमल आणि आलोक यांचा विवाह झाला होता. लग्नात घरातील सामानासह दागिने आणि दहा लाख रुपये कोमलच्या वडिलांनी तिच्या सासरच्या माणसांना दिले होते. मात्र त्यानंतरही हुंड्यासाठी तिला मारहाण सुरूच होती. आता तिच्याकडे कार आणण्यासाठी वारंवार दबाव आणला जात होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: jharkhand woman commits suicide by hanging in dhanbad video viral harassing inlaws for dowry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.