OMG! उपचार कमी लग्नेच जास्त करत आहे हा डॉक्टर, पत्नीनेच केला त्याचा भांडाफोड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 12:21 PM2021-07-20T12:21:57+5:302021-07-20T12:29:38+5:30
डॉक्टरने उत्तर प्रदेशात तीन आणि झारखंडच्या गढवामध्ये एक लग्न केलं. आता त्याच्या पत्नी त्यांचा हक्क आणि मुलांसाठी बापाचं नाव मागत आहेत.
पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरं लग्न करणं कायद्याने गुन्हा आहे. पण एका डॉक्टरला या गुन्हाची काही चिंताच नाही. डॉक्टर उपचारापेक्षा लग्नच अधिक करत आहे. या रंगीन डॉक्टरचं नाव आहे एलएस मिश्रा. डॉक्टरवर आरोप आहे की, त्याने उत्तर प्रदेशात तीन आणि झारखंडच्या गढवामध्ये एक लग्न केलं. आता त्याच्या पत्नी त्यांचा हक्क आणि मुलांसाठी बापाचं नाव मागत आहेत.
या रंगबाज डॉक्टरच्या रंगीन कृत्यांचा खुलासा त्याची पत्नी असण्याचा दावा करणाऱ्या एका महिलेने केला. महिला उत्तर प्रदेशच्या वाराणसीची राहणारी आहे. या महिलेचं नाव साधना असून ती झारखंडच्या गढवामध्ये जाऊन पतीचा शोध घेत आहे. ती त्याच व्यक्तीचा शोध घेत आहे जो व्यवसायाने डॉक्टर आहे आणि तिच्यासहीत आणखीही काही महिलांचा पती आहे. (हे पण वाचा : फिजिकल टेस्टच्या नावाखाली महिला खेळाडूंना कपडे काढण्यास सांगितले; प्रशिक्षकाविरोधात FIR दाखल)
साधनाने सांगितलं की, 'काही वर्षापूर्वी जेव्हा डॉक्टर एलएस मिश्रा बनारस होते तेव्हा उपचारादरम्यान त्यांच्याशी संपर्क झाला होता आणि नंतर आम्ही लग्न केलं. पण मला जराही अंदाज नव्हता की, त्यांचं आधीच लग्न झालेलं आहे. जेव्हा मला हे समजलं तर मी त्यांचा विरोध केला. तेव्हा त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली'. (हे पण वाचा :धक्कादायक! लग्नानंतर शारीरिक संबंध ठेवण्यास करत होती टाळाटाळ, नाराज पतीने उचललं 'हे' पाउल!)
साधनाने सांगितलं की, 'डॉक्टर असंही म्हणाला की, त्याने याआधीही एका मुलीचा जीव घेतला आहे. त्यामुळे मी घाबरले. यादरम्यान तो मला सोडून पळून गेला. तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जऊन चुकीचे उपचार करणं आणि महिलांना फसवून त्यांच्याशी लग्न करणं आणि पुन्हा सोडून पळून जाणं हे करत होता. आज मी गढवामध्ये आली आहे. इथे तो आणखी एक लग्न करत आहे'.
साधना पुढे म्हणाली की, 'मला माझा अधिकार आणि माझ्या मुलांना त्यांचं नाव हवं आहे'. तर महिलेच्या भावाने सांगितलं की, डॉक्टर एलएस मिश्रा एक फेक आणि फसवणारा व्यक्ती आहे. तो घरोघरी जाऊन लोकांकडून पैसे घेतो आणि परत द्यायची वेळ आली की, ते गाव सोडून पळून जातो'.
साधनाचा भाऊ म्हणाला की, डॉक्टर एलएस मिश्रा प्रत्येक ठिकाणी लग्न करून महिलांना असाच भटकण्यासाठी सोडून देतो. आम्ही इथे न्याय मागण्यासाठी आलो आहोत. दुसरीकडे महिलेच्या तक्रारीनंतर पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत. डॉक्टर सध्या फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.