स्ट्रगलिंग अभिनेत्रीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, स्टॉक ब्रोकर जिग्नेश मेहताविरोधात गुन्हा दाखल!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 03:42 PM2022-08-06T15:42:44+5:302022-08-06T15:43:21+5:30

Jignesh Mehta : जिग्नेश मेहतावर लैंगिक छळ आणि विनयभंगाचा आरोप आहे.

jignesh mehta mumbai share broker held for sexual assault on struggling actress in mumbai at hotel | स्ट्रगलिंग अभिनेत्रीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, स्टॉक ब्रोकर जिग्नेश मेहताविरोधात गुन्हा दाखल!

स्ट्रगलिंग अभिनेत्रीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, स्टॉक ब्रोकर जिग्नेश मेहताविरोधात गुन्हा दाखल!

Next

मुंबई : एका स्ट्रगलिंग अभिनेत्रीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली पश्चिम मुंबईतील एका हॉटेलमधून स्टॉक ब्रोकरला अटक करण्यात आली आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील हॉटेलमध्ये अभिनेत्री-मॉडेलवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी स्टॉक ब्रोकर जिग्नेश मेहता (Jignesh Mehta) याच्याविरुद्ध अंधेरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिग्नेश मेहतावर लैंगिक छळ आणि विनयभंगाचा आरोप आहे.

जिग्नेश मेहताने पीडितेला मुंबईतील अंधेरी एमआयडीसी येथील हॉटेलच्या खोलीत भेटण्यास सांगितले होते. यावेळी अनेक बॉलिवूड निर्मात्यांना ओळखतो आणि काम मिळवून देतो, असे जिग्नेश मेहताने पीडितेला सांगितले होते. तसेच, पीडितेला शुक्रवारी हॉटेलच्या खोलीत जेवणासाठी उपस्थित राहण्यास सांगितले. पीडित तरूणी हॉटेलच्या खोलीत गेली असता जिग्नेश मेहताने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याचा मित्रही तिथे उपस्थित होता. 

दरम्यान,  घाबरलेल्या पीडितेने मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. तिचा आरडाओरडा ऐकून हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत पीडितेची सुटका केली. तसेच, त्यांनी जिग्नेश मेहताला पकडून अंधेरीतील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले. यानंतर पोलिसांनी जिग्नेश मेहता विरोधात एफआयआर दाखल केला असून, त्याच्यावर कलम 354, 354 बी आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: jignesh mehta mumbai share broker held for sexual assault on struggling actress in mumbai at hotel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.