Jitendra Awhad Video: जामीन मिळाला.... विनयभंग प्रकरणात जितेंद्र आव्हाडांना मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 03:26 PM2022-11-15T15:26:51+5:302022-11-15T15:54:49+5:30

दुपारच्या सत्रानंतर अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी घेण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार, दुपारी ३ वाजत न्यायाधीशांनी निकाल दिला. 

Jitendra Awhad appeared big, Thane court granted pre-arrest bail in case of molestation | Jitendra Awhad Video: जामीन मिळाला.... विनयभंग प्रकरणात जितेंद्र आव्हाडांना मोठा दिलासा

Jitendra Awhad Video: जामीन मिळाला.... विनयभंग प्रकरणात जितेंद्र आव्हाडांना मोठा दिलासा

googlenewsNext

ठाणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विनयभंग प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. ठाणे कोर्टात याप्रकरणी सुनावणी झाल्यानंतर न्यायाधीशांनी दुपारी ३ वाजता निर्णय दिला. त्यानुसार, जितेंद्र आव्हाड यांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने जामीन देताच कोर्ट आणि पोलीस स्टेशन परिसरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. विनयभंगाच्या आरोपांच्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी मंगळवारी दुपारी झाली. त्यानंतर, दोन्ही बाजूकडील युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर ठाण्याचे सत्र न्यायाधीश प्रणय गुप्ता यांनी दुपारच्या सत्रानंतर अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी घेण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार, दुपारी ३ वाजत न्यायाधीशांनी निकाल दिला. 

आव्हाड यांच्या विरोधात राजकिय वैमनस्यातून भाजपच्या पदाधिकारी महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून यात स्पर्श करण्यामागे तसा कोणताही कथित आरोपी तथा आपले अशील आव्हाड यांचा हेतू नव्हता.  मुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमात गर्दी झाल्यामुळे ती बाजूला करताना त्यांनी बाजूला सरण्यास सांगताना तिला हात लागला, असे सांगत आव्हाड यांचे  वकील गजानन चव्हाण यांनी घटनास्थळी असलेला व्हिडिओ देखिल न्यायालयात सादर केला. तसेच हा विनयभंगाचा गुन्हा होउ शकत नसल्याचा युक्तिवाद केला. त्यावर सरकारी वकील वर्षा चंदने यांनी मात्र जमिनीला आक्षेप घेत फिर्यादी महिलेने हा प्रकार घडल्यानंतर तातडीने मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचे सांगून यात राजकीय दबाव नसल्याचे स्पष्ट केले. शिवाय, वर्तकनगर च्या गुन्ह्यात १२ नोव्हेंबर रोजी दिलेल्या जमिनाच्या अटींमध्ये पुन्हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा न करण्याची अटही, त्यांनी मोडली. जो व्हिडिओ सादर केला, त्यातही तिला स्पर्श केल्याचे स्पष्ट दिसते. आरोपी स्वतः आमदार असल्यामुळे तपासात दबाव आणण्याचीही शक्यता आहे. या दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्या. गुप्ता यांनी यावर दुपारच्या सत्रात सुनावणी घेण्याचे जाहीर केले होते.

 

Web Title: Jitendra Awhad appeared big, Thane court granted pre-arrest bail in case of molestation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.