अब्बू मी हरलो... लॉकडाऊनमुळे बेरोजगारी पत्करलेल्या तरुणाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 08:47 PM2020-08-17T20:47:53+5:302020-08-17T20:48:39+5:30
नया नगर भागातील पूजा नगरच्या गुलिस्तान नगर मध्ये डॉ शाबाद अन्सारी यांचा दवाखाना आहे.
मीरारोड - नोकरी नसल्याने तणावाखाली असलेल्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मीरारोच्या नया नगर भागात घडली आहे .
नया नगर भागातील पूजा नगरच्या गुलिस्तान नगर मध्ये डॉ शाबाद अन्सारी यांचा दवाखाना आहे. दवाखान्या पुढील पत्र्याच्या शेडला आज सोमवारी सकाळी गळफास घेतलेला तरुणाचा मृतदेह आढळून आला . त्याच्या खिशात एका व्हिजिटिंग कार्डावर लिहलेले आढळले. दुबईची नोकरी गेली आणि दुसरी नोकरी नसल्याने तणावाखाली आहे. अम्मी , अब्बू मी हरलो असे त्यात लिहलेले असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले .
सलमान हा फेब्रुवारी महिन्यात दुबईची नोकरी गेल्याने तो मीरारोडला आपल्या घरी परतला होता . पण नंतर कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन असल्याने त्याला दुसरीकडे नोकरी मिळत नव्हती . त्यामुळे तो नेहमी वैफल्यग्रस्त होता . यातूनच त्याने आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणी नया नगर पोलीस अधिक तपास करत आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल
लज्जास्पद! चहा करण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीच्या गुप्तांगात टाकली मिरची पावडर
बॉलिवूड अभिनेत्यासह २३ जणांना अटक, कोरोना दहशतीखालीही गोव्यात रंगली रेव्ह पार्टी
धक्कादायक! वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये चार युवकांचा समावेश